School sakal
जळगाव

Jalgaon News : प्राथमिक शाळांमध्ये आजपासून ‘दहा दिवस गणिता’साठी उपक्रम : जिल्हाधिकारी प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : निपूण भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात मंगळवारपासून (ता. १०) २० ऑक्टोंबरपर्यंत इयत्ता १ ली ते ७ वीच्या मुलांसाठी ‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी ही माहिती दिली.

निपूण भारत अभियानांतर्गत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे अंकगणित कौशल्य वृद्धींगत व्हावे, यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. (Activities for Ten Days of Mathematics in Primary Schools from today jalgaon news)

या कार्यक्रमाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, डायट प्राचार्य, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी हे काम करणार आहेत.

उपक्रमात गणनपूर्व तयारी, संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया, सराव, तसेच कृती या पद्धतीचा वापर करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्याचा वापर करून गणित रंजक पद्धतीने शिकविण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत शिक्षकांना त्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन पूरक अधिकच्या कृतींचे आयोजन करण्याची मुभा आहे. आनंददायी कृतींचा, गणितीय खेळांचा, परिसरात व शाळेत उपलब्ध साहित्याचा यथायोग्य वापर करून गणितीय संकल्पनांचे विद्यार्थ्यांना आकलन होईल अशा कृती कराव्यात. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण होईल.

पायाभूत क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यकतेनुसार उच्चस्तर अध्ययन कृती घेण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या व डायटमधील सर्व अधिकाऱ्यांनी दैनंदिन किमान २ शाळांना भेटी कराव्यात. हा उपक्रम सुरू असल्याची खात्री करावी. अशा सूचना देण्यात आल्या असल्याचेही अंकित यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT