grant news esakal
जळगाव

Jalgaon News | केळी, कापसाला अनुदान द्या, अन्यथा आंदोलन : ॲड. रवींद्र पाटील

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कापूस, केळी हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नगदी पिके आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसानीचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव दौऱ्यात केली होती.

मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. शासनाने ही भरपाई दिली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभय्या पाटील यांनी दिला. (Advocate Ravindra Patil say Subsidize banana cotton Fill posts in Agriculture Department Jalgaon News )

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात मंगळवारी (ता. ७) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महानगरप्रमुख अशोक लाडवंजारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, संदीप पाटील, सलीम इनामदार आदी उपस्थित होते.

ॲड. पाटील म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात केळी पिकावर रोग पडला होता. त्यात साडेआठ हजार हेक्टर शेतीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, या शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. तसेच केळी, कापूस पिकांच्या विम्याचे अनुदानही प्राप्त झालेले नाही.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

शासनाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाने लवकरच शेतकऱ्यांना अनुदान अदा करावे, तसेच शासनाने नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती.

मात्र, जिल्ह्यातील ८२ हजार शेतकरी अद्यापही या अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना हे अनुदान तत्काळ अदा करावे. शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे त्वरित लक्ष दिले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यातील कृषी विभागात ४६ टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पालकमंत्र्यांचा निषेध

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेल्या टीकेचाही पक्षातर्फे ॲड. पाटील यांनी निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या भाषणानंतर सोनं 1,600 रुपयांनी महाग; चांदी 2 महिन्यांच्या उच्चांकावर; काय आहे ताजा भाव?

NEET UG 2026 Exam Cancelled: ९ वर्षांत १६ हून अधिक परीक्षा रद्द! २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून NTA का अन् कशी अपयशी ठरत आहे?

Metro 13 : मिरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ ला प्रतीक्षा मंत्रिमंडळाच्या मान्यतेची

Latest Marathi News Live Update : गावठी दारू अड्ड्यावर धाड; 4 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

MSRTC: सर्व एसटी बसचे रूपांतर ई-बसमध्ये होणार, महामंडळ २०० चार्जिंग स्टेशन उभारणार, परिवहनमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT