Urvesh Salunkhe sitting on a tree during the agitation. esakal
जळगाव

Jalgaon News : मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी झाडावर चढून अनोखे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे, या मागणीसाठी बुधगाव येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचा युवा कार्यकर्ता उर्वेश साळुंखे याने शुक्रवारी (ता. १३) झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. आंदोलनाला यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी निवेदनावर स्वाक्षरी करून पाठिंबा दिला. (agitation by climbing tree to meet Chief Minister jalgaon news)

निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे, या मागणीसाठी रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवून आंदोलनाचा इशारा उर्वेश साळुंखे यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालावे व या प्रश्नावर वेळ द्यावी, यासाठी झाडावर बसून आज लाक्षणिक आंदोलन केले. आंदोलन स्थळी माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी भेट दिली.

माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

या वेळी अजित पवार यांनी लवकरच मंत्रालय येथे सदर प्रश्नावर भेट देण्याचे आश्वासन दिले.

डॉ. चंद्रकांत बारेला, अतुल ठाकरे, शशिकांत पाटील, बबलू बोरसे, संरपच रवींद्र सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य यशवंत सोनवणे, कैलास कोळी, समाधान बाहरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. मनोज सनेर, रामकृष्ण पाटील‌, धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, हिरामण कंखरे, रणजित शिंदे, सुनील पाटील, देविदास देसले आदींनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला. या वेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी रवींद्र माळी, तलाठी गजानन पाटील, कोतवाल चंद्रकांत साळुंखे, पोलिस खात्याचे प्रमोद पारधी, संजय निळे, पोलिस पाटील बापू धनगर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT