MLA Anil Patil, former MLA Sahebrao Patil, cheering after the election of the newly appointed Speaker and Deputy Speaker.
MLA Anil Patil, former MLA Sahebrao Patil, cheering after the election of the newly appointed Speaker and Deputy Speaker.  esakal
जळगाव

Amalner Bazar Samiti : बाजार समितीवर सभापतिपदी महाविकास आघाडीची सत्ता, विरोधक गैरहजर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अशोक आधार पाटील (लोण) तर उपसभापतिपदी कॉंग्रेसचे सुरेश पीरन पाटील(निंभोरा) यांची बिनविरोध निवड झाली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांचे नाव सभापतिपदासाठी निश्चित झाले असताना ऐनवेळी मात्र वेगळीच खेळी झाली. (amalner Ashok Aadhar Patil was elected as Chairman of Agriculture Produce Market Committee jalgaon news)

महाविकास आघाडीचे संचालक सहलीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मंगळवारी (ता.१६) सकाळी हजर झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सदस्यांना स्वतंत्र विचारपूस केल्यानंतर सभापती म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील व उपसभापती म्हणून काँग्रेसचे सुरेश पिरन पाटील यांचे नाव निश्चित झाले.

मात्र सभापतिपद एकच वर्षासाठी देत असल्याने सचिन पाटील यांनी नकार दिला, तोपर्यंत ११ वाजले होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही मिनिटेच शिल्लक असताना ऐनवेळी अशोक आधार पाटील यांचे नाव सभापती म्हणून निश्चित झाले. विरोधी गटाचे चारही सदस्य निवड प्रक्रियेत गैरहजर राहिले.

दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आर. आर. पाटील यांनी माघारीची मुदत संपल्यानंतर बिनविरोध निवड जाहीर केली. नवनियुक्त सभापती व उपसभापती यांचा आमदार अनिल पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सत्कार केला. निवड जाहीर झाल्यानंतर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निवडणूक प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक अधिकारी व्ही. एम. जगताप, सुनील महाजन, सचिव उन्मेष राठोड, सुनील पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी नवनियुक्त संचालक डॉ. अनिल शिंदे, प्रा. सुभाष पाटील, अशोक पाटील, भोजमल पाटील, नितीन पाटील, सुषमा देसले, पुष्पा पाटील, समाधान धनगर,भाईदास भिल, वृषभ पारख, प्रकाश अमृतकार उपस्थित होते.

या वेळी ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, भागवत पाटील, रिटा बाविस्कर, कविता पवार, मंदाकिनी भामरे, आशा चावरिया, अलका पवार, गौरव पाटील,भूषण भदाणे, गणेश भामरे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुणाचीही नाराजी नाही : आमदार पाटील

निवड जाहीर होण्यापूर्वीच सचिन पाटील तडक निघून गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. याबद्दल सचिन पाटील यांना विचारले असता त्यांनी मी नाराज नाही, परंतु माझ्या निष्ठेचा भंग झाला आहे. येणाऱ्या निवडणुकांवर याचे परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याचा दावा केला जात असला तरी अशोक आधार पाटील हे राष्ट्रवादीचे सदस्यही नाहीत, असेही तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी सांगितले. याबाबत आमदार अनिल पाटील यांना विचारले असता कुणाचीही कुठलीच नाराजी नाही, सचिन पाटील हे देखील निवडप्रक्रियेत सहभागी होते. भविष्यात त्यांनाही संधी दिली जाईल, असे आमदारांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT