anil bhaidas patil esakal
जळगाव

Jalgaon Anil Patil : खडसेंना नुकसानीच्या मदतीच्या माहितीचा विसर : अनिल पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Anil Patil : शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केवळ एका जिल्ह्यासाठी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांची माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यात येते. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. आता ही माहिती विभागाकडे पाठविण्यात आली आहे. (anil patil comment on eknath khadse statement jalgaon news)

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली. मात्र राज्याचे माजी मंत्री राहिलेले एकनाथ खडसे हे मात्र विनाकारण टीका करीत आहेत. शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत कधी व कशी केले जाते, याचा त्यांना बराच काळ मंत्री न राहिल्यामुळे विसर पडलेला दिसत आहे, असा टोला राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी लगावला. जळगाव येथे ते माध्यमांशी बोलत होते.

जळगाव जिल्हा बँकेत संचालकाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी मंत्री अनिल भाईदास पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी, आपला फोटो लावू नये, लावल्यास आपण गुन्हा दाखल करणार आहोत, असा इशारा अजित पवार पवार गटाला दिला आहे. याबाबत अनिल पाटील यांना प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, की शरद पवार आम्हाला पूजनीय आहेत.

त्यामुळे त्यांचा फोटो आम्ही लावणार आहोत. तसेच कायद्यात अशी काही तरतूद दिसत नाही, कोणाचा फोटो लावला म्हणून कारवाई झाली. आम्ही त्यांचा फोटो लावणार आहोत. त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

स्वागताचे बॅनरही लावणार

शरद पवार ४ सप्टेंबरला जळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्याची तयारी शरद पवार गटातर्फे सुरू आहे. त्याबाबत बोलताना मंत्री अनिल पाटील म्हणाले, शरद पवार जळगाव दौऱ्यावर आल्यास त्यांच्या स्वागताचे फोटो आम्हीही लावणार आहोत.

मदतीबाबत खडसेंना माहितीचा विसर

राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी तीन मंत्री असूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही, अशी टीका केली होती. त्यावर बोलताना अनिल पाटील म्हणाले, की एकनाथ खडसे हे या खात्याचे मंत्री राहिलेले आहेत.

मात्र आता त्याला बराच काळ झाल्याने त्यांना मदतीच्या माहितीबाबत विसर पडणे स्वाभाविक आहे. परंतु त्यांना मी जेव्हा भेटेल त्या वेळी या प्रक्रियेची आठवण करून देईन. जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पंचनामे झाले असून, लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यसभेसाठी निवड झाल्यानंतर अ‍ॅड. उज्ज्वल निकमांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी सूचित केलं आणि...'

Nitin Gadkari : भाजपाला मिळणार पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष? नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं....

Chhagan Bhujbal : भुजबळांचा गौप्यस्फोट: जिल्हा बँक अडचणीत आणणारेच निवडणुकीच्या मैदानात

आता संभ्रम नको...राजकीय युती गरजेचीच! संजय राऊतांची 'रोखठोक' भूमिका, मुखपत्रातून मनसेला घातलीये 'ही' साद

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला उद्या पृथ्वीवर परतणार! भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णक्षण, कुठे पाहाल लँडींग, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT