Roads in Hanuman Gymnasium area of ​​the city were asphalted on Saturday night. The next day, Sunday morning, the dug road. esakal
जळगाव

Jalgaon News : रस्त्याचे रात्री डांबरीकरण, दिवसा खोदकाम; ढिसाळ कारभाराला जबाबदार कोण?

नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना आमदार निधीतून मंजूर असलेल्या शहरातील मुख्य रस्त्याच्या कंत्राटदाराने शनिवारी (ता.२३) रात्री डांबरीकरण केले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथे नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना आमदार निधीतून मंजूर असलेल्या शहरातील मुख्य रस्त्याच्या कंत्राटदाराने शनिवारी (ता.२३) रात्री डांबरीकरण केले.

मात्र रविवारी (ता.२४) सकाळी तोच रस्ता पाणीपुरवठा कंत्राटदाराने जलवाहिनीसाठी खोदून मोकळा केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, विकासकामांचा पुरता बोजवारा उडविणाऱ्या या ढिसाळ कारभाराला जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.(Asphalting of roads at night digging during day jalgaon news)

गेल्या दोन, अडीच वर्षांपासून वरणगाव येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. कंत्राटदार कंपनी अगदी संथगतीने काम करीत असल्याने नागरिक वैतागले आहेत. शहरात गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. संबंधित कंत्राटदार कंपनीने शहरातील लहान, मोठे सर्वच रस्ते खोदून मोकळे केले आहेत.

रस्त्यांवर राडारोड, चिखल, माती, दगडधोंडे ठिकठिकाणी खड्डे तर आहेतच, त्यात भर पडतेय ती फुटलेल्या जलवाहिन्यांची. वरणगावकरांची अपूर्ण तहान पूर्ण भागावी म्हणून नवीन पाणीपुरवठा योजना शहरात आणण्यात आली. या योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून, तिचे काम सुरू आहे का थांबलेय हे देखील कळत नाही.

या पाणीयोजनेसाठी वरणगावमध्ये अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. यामुळे ठिकठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्या नागरिकांना आजारांचे आमत्रंण देत आहे. कंत्राटदार कंपनी आणि जीवन प्राधिकरणाने मनमानी पद्धतीने केलेले खोदकाम यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था ही भीषण अशी झाली आहे.

नगरपरिषदेने सदर कंत्राटदाराकडून मुदतीच्या आत काम पूर्ण करून घेणे अपेक्षित असताना कंत्राटदार कंपनी संथ गतीने काम करीत आहे. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह वरणगाव नगरपरिषदेचेही दुर्लक्ष होताना दिसत असले तरी आमदार निधीअंतर्गत भोगावती नदीपात्रापासून हनुमान व्यायामशाळेपर्यंत जवळपास १०० मीटर मुख्य रस्त्याचे डांबरीकरण शनिवारी (ता. २३) रात्री करण्यात आले.

मात्र रविवारी (ता.२४) सकाळी तोच डांबरीकरण केलेला मुख्य रस्ता नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीसाठी पुन्हा खोदावा लागला आहे. शहरात चाललय काय? ‘आंधळ दळतयं! आणि कुत्र पीठ खातंय’ अशी परिस्थिती झाली आहे. शहरातील राजकारणी आपापल्या प्रसिद्धीसाठी मशगूल असल्याने शहरांत कुठे काय चाललय, हे देखील त्यांना माहित नाही.

खोदलेले रस्ते ठेकेदारांचे कुरण

गेल्या अनेक दिवसांपासून वरणगावकर खोदलेल्या रस्त्यांमुळे त्रस्त आहेत. खोदलेले रस्ते हे जणू ठेकेदारांचे कुरणच बनले आहेत. आधी चांगले रस्ते खोदायचे आणि ते पुन्हा नवीन बनवायचे आणि पुन्हा ते खोदायचे ही निरंतर प्रक्रिया सुरू झाली आहे की काय, असे वाटते.

रस्ते खोदण्याचे काम आणि पाणीपुरवठ्याच्या नावाखाली ठेकेदारांचे आणि सत्ताधाऱ्यांचे पोट भरण्यासाठी सुरू आहे की काय, असा प्रश्न पडतो. प्रसंगी मुख्याधिकारी रजेवर असल्याने त्यांचा भ्रमणधनी बंद आहे तर बांधकाम अभियंत्यांची बदली झाली आहे. मात्र प्रश्न कोणाकडे मांडवा, अशी अवस्था शहरवासीयांची झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT