esakal
जळगाव

Jalgaon Crime News : सोशल मिडीयावर आक्षेपार्ह व्हिडीओ टाकणे अंगलट; वकिलाविरूद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : एका समाजाविषयी आक्षेपार्ह विधान करीत त्या समाजाची बदनामी करण्याच्या हेतून सोशल मीडियात व्हीडीओ व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ॲड. केदार भुसारी (रा. बळीराम पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case filed against Advocate Due to uploading offensive videos on social media jalgaon crime news)

दूध फेडरेशन परिसरातील भारतनगरात पवन रमेश घुसर हे कुटूंबियांसह वास्तव्यास असून, एका व्हॉट्सअप ग्रुपवर शनिवारी (ता. ५) जातीवाचक भाषेत तयार केलेला व्हीडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एका समाजाची बदनामी होत असल्याने त्यांनी माहिती घेतली असता, तो व्हीडीओ ॲड. भुसारी यांनी तयार केल्याचे समजले.

त्यांनंतर श्री. घुसर यांनी कारवाईची मागणी करत व्हीडीओ महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांना पाठविला. त्यांनी हा व्हीडीओ मनपा कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर शेअर केला होता. या प्रकाराबाबत त्या समुदायातील नागरिकांना माहिती मिळताच, समाजाचा अपमान झाल्याचे वाटून ते लगेच शहर पोलिसात तक्रार देण्यासाठी आले.

समाजाची बदनामी करणारा व्हीडीओ पोलिसांना देवून घुसर यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानुसार ॲड. भुसारी यांच्याविरुद्ध अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसला काही उद्देशच नाही

दरम्यान, याबाबत ॲड. भुसारी म्हणाले की, माझे ऑफीस आणि घर असलेल्या बळीराम पेठ परिसरात अनेक दिवसांपासुन डुकरांचा उपद्रव आहे. हा शहरातील जुन्या पद्धतीच्या नामोल्लेखाने ओळखला जाणारा परिसर असून, त्यास चौधरी वाडा, पाटील वाडा, ब्राह्मण गल्ली असेच आपण बोलतो.

उपायुक्तांना पाठवलेल्या फेाटो-व्हिडीओ खाली अनावधनाने तसा उल्लेख झाला. कुठल्याही समाज विशेषाच्या भावना दुखावण्याचा माझा उद्देश नाही. परिसरातील अनेक समाजबांधव माझे चांगले मित्र आहेत. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगीरी व्यक्त करतो. न्यायालयात याबद्दल दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिस ठाण्यात जमाव

व्हिडीओ व्हायरल झाल्याने भावना दुखवल्या जावून, अक्षेपार्ह व्हिडीओ टाकणाऱ्या वकिलांवर कारवाईच्या मागणीसाठी संबंधीत समाज बांधवांनी एकत्र येत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT