Murder
Murder sakal
जळगाव

Jalgaon Crime News : अमळनेर येथील खुनाच्या घटनेला वेगळेच वळण; आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : अक्षय भिल याच्या मृत्यूच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.२५) महाराणाप्रताप चौकात रास्ता रोको करून सामान्य जनतेला वेठीस धरणे, विशिष्ट समाजाला अश्लील शिवीगाळ करणे यासह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या २६ जणांसह अज्ञात १५० लोकांवर दंगल, सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case of rioting against 150 people who blocked road to protest death of Akshay Bhil amalner jalgaon crime news)

अक्षय भिल याच्या खुनाच्या निषेधार्थ भिल समाजाने महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको करून किरकोळ दगडफेक केली. तसेच टायर जाळले आणि सामान्य नागरिकांना दादागिरी करून त्यांचे रस्ते अडवले. यामुळे अनेकांना त्रास झाला. पोलिसांची गाडी देखील आंदोलनकर्त्यांनी अडवली होती.

आंदोलनात धुळे, शिंदखेडा, पारोळा, चाळीसगाव, अमळनेर ग्रामीण भागातून देखील भिल समाज एकत्र झाला होता. महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. त्यामुळे पोलिस प्रशासनातर्फे पोलिस नाईक दीपक माळी यांनी फिर्याद दिली, की विकास भिल, गणेश त्र्यंबक भिल, त्र्यंबक राजाराम भिल (रा. पाइप फॅकटरीजवळ), भय्या भिल (रा. हिवरखेडा, ता. पारोळा), विजय दादा भिल (रा. बंगाली फाइल), विनोद भिल (रा. अवधान, ता. धुळे), रवींद्र भिल (जापी शिरडाने, धुळे), लक्ष्मण भिल (डांगरी),

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

उमेश भिल (राजमाने, ता. चाळीसगाव), सुरेश मोरे, युवराज मोरे, श्यामदेव मोरे, नामदेव मोरे, नरेश भिल (रा. पिंपळे रोड, अमळनेर), रवी सोनवणे, रमेश सोनवणे (रा. ताडेपुरा, पैलाड), अनंत पवार (रुबजीनगर), बापू भिल (रामवाडी), गुलाब बोरसे (रा. हिंगोणे), राजू भिल (दाजीबानगर), युवराज भिल (रा. राजारामनगर), किरण सोनवणे, गलवाडे रोड, मगन रूपचंद भिल (रा. सात्री), रवी सुखदेव मालचे (रा. बोहरा), रतिलाल शेनपडू भिल (रा. कलंबू) यांनी बेकायदा मंडळी जमवून एसटीवर दगडफेक, संशयिताच्या घरावर दगडफेक करून नुकसान केले.

एका समाजाला शिवीगाळ केली. या साऱ्या घटनेचे पोलिसांनी व्हीडिओ चित्रीकरण करून घेतले आहे. म्हणून वरील सर्व संशयितांसह अज्ञात असे एकूण १५० जणांवर सरकारी कामात अडथळा, जिल्हाधिकाऱ्यांच्या ३७ (१) चे उल्लंघन, दंगल, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, रस्ता अडवणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT