Jalgaon: Collector Aman Mittal while giving information at the press conference held on Monday at the collector's office. Neighboring Superintendent of Police M. Rajkumar, Zilla Parishad Chief Executive Officer Pankaj Asia. 
जळगाव

Jalgaon News : शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज जळगावत; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मंगळवारी (ता. २७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव शहरात येत आहेत. हा कार्यक्रम पोलिस कवायत मैदानावर दुपारी तीनला होईल.

कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. पाऊस आला, तरी किमान ७५ हजार नागरिक बसू शकतील, अशा वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी (ता. २६) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.(Chief Minister Deputy Chief Minister today in Jalgaon under government Dari initiative Collector information 75 thousand citizens will sit in waterproof tent jalgaon News)

पत्रकार परिषदेस पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया उपस्थित होते. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोचून त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असा कार्यक्रमाचा उद्देश आहे.

आरोग्य तपासणीसह रक्तदान शिबिर

कार्यक्रमस्थळी पोलिस कवायत मैदानावर मोठे मंडप उभारले आहेत. सकाळी साडेआठपासून विविध कार्यक्रम सुरू होतील. सकाळी साडेआठला आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर सुरू होईल.

नूतन मराठा महाविद्यालयात रोजगार मेळावा सुरू राहील. दुपारी कार्यक्रमस्थळी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दुपारी अडीचला जळगाव विमानतळावर पोचतील. तीनला कार्यक्रम सुरू होईल. दोघांचे स्वागत केळीपासून तयार केलेल्या बिस्कीट, लाडू, चिप्स बास्केट देऊन होईल. सोबत केळी, भरिताची वांगीही असतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विविध स्टॉल्स

कार्यक्रमाठिकाणी शासकीय योजनांची माहिती देणारे विविध स्टॉल लावण्यात येतील. नागरिकांनी या स्टॉलला भेट देऊन योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी केले.

तक्रार निवारण कक्षही

अनेकांना मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करायच्या असतात. मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांकडे जाता येत नाही, अशा नागरिकांसाठी तक्रार निवारण कक्ष असणार आहे. त्यात नागरिकांच्या तक्रारी घेऊन त्यांना टोकन क्रमांक दिला जाईल. त्या तक्रारी मुंबईत मंत्रालयात पाठविल्या जातील.

दहा लाभार्थ्यांना मंत्र्यांच्या हस्ते लाभ

दहा शासकीय विभागातील लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शिंदेउपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लाभ दिले जातील. यात महसूल, कृषी, संजय गांधी योजना, रेशनकार्ड, जातीचे दाखले आदींचा समावेश असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT