crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : ‘FDA’च्या 2 तोतया अधिकाऱ्यांना अटक

अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी भासवून शहरातील जयहिंद कॉलनीत गुटखा विक्रेत्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन भामट्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी भासवून शहरातील जयहिंद कॉलनीत गुटखा विक्रेत्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन भामट्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर तिसरा संशयित फरार झाला असून, तिघांविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक केलेल्या दोन संशयितांमध्ये एकजण हा पोलिस कर्मचारी असून, यापूर्वीही त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (city police arrested two fake officials demanded extortion of Rs 5 lakh from gutka seller cities jalgaon crime news)

शहरातील जयहिंद कॉलनी परिसरात तीन तोतया अधिकारी वाहन उभे करून संशयितरीत्या फिरत असताना लक्षात आले. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराव सचदेव यांना मिळाली असता त्यांनी भ्रमणध्वनीवरून पोलिसांना तत्काळ माहिती दिली.

ही घटना चोपडा शहराचे प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण यांना सांगितली असता लागलीच घटनास्थळी प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण व इतर पोलिसांची कुमक त्या ठिकाणी येऊन संशयितरीत्या तोतयागिरी करताना हे भामटे आढळून आले.

..अशी घडली घटना

फिर्यादी जितेंद्र गोपाल महाजन (वय २८ रा. लोहिया नगर चोपडा) व त्यांच्यासोबत असलेले सचिन अरुण पाटील यांना ते औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याने भासवून आरोपी व सोलापूर विभागात पोलिस कर्मचारी असलेला राहुल शिवाजी देवकते (वय ३५, रा. साकटी रोड, पंढरपूर, जि. सोलापूर)

विनायक सुरेश चवरे (वय ३५, रा. गोविंदपुरा, सोलापूर रोड, गुर्जर वाडा, जि. सोलापूर), लक्ष्मण ताड (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) अशा तीन संशयितांनी जितेंद्र महाजन यांच्याकडून पाच लाख रुपये खंडणी मागितली.

पोलिस घटनास्थळी

या प्रकरणी महाजन यांच्या फिर्यादीवरून तीनही तोतया अधिकाऱ्यांविरुद्ध चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संशयित राहुल शिवाजी देवकाते व विनायक सुरेश चवरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक निरीक्षक अजित सावळे तपास करीत आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व चोपडा शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली असून, संशयितांच्या ताब्यातील चारचाकी वाहनही जप्त केले आहे. या वाहनावरही संशयितांनी बनावट नंबर प्लेट लावली असल्याचे तपासात अधिकारी अजित सावळे यांना आढळून आले.

मंत्रालयातून फोन..

या तोतयेगिरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करू नये, यासाठी मुंबई येथील मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून जवळपास २० ते २५ वेळा पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल न करण्यासाठी माझ्यासमोर फोन आले व गुन्हा दाखल करू नका, असे सांगितले.

तसेच या खंडणी प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT