जळगाव

Jalgaon Crime News : शेतरस्त्याच्या वादातून पिंपळगावात हाणामारी; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथून जवळच असलेल्या पिंपळगाव बुद्रुक येथे शेती वहिवाटीच्या रस्त्यावरून दोन शेतकरी कुटुंबांमध्ये शुक्रवारी (ता. १०) वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने एकजण गंभीर, तर दोघे किरकोळ जखमी झाले.

याप्रकरणी वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला.(Clash in Pimpalgaon due to farmers dispute jalgaon crime news)

पिंपळगाव बुद्रुक (ता. भुसावळ) येथील शेतकरी विष्णू तळेले व निवृत्ती पाटील यांचे करंजी शिवारात गट क्रमाक १७४ /१ शेत आहे. या शेत गटामधील शेती वहिवाटीच्या रस्त्यावरून दोघांमध्ये पूर्वीपासून वाद आहे.

शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास शेताजवळ पुन्हा वाद झाला व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये किरण पाटील, निवृत्ती पाटील व सविता पाटील यांना विष्णू तळेले, रामा तळेले व रेखाबाई तळेले यांनी शिवीगाळ करीत काठी व दगडाने बेदम मारहाण केली, असा आरोप आहे.

यात किरण पाटील व विष्णू पाटील जखमी झाले असून, त्यांच्यावर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. यापैकी एकजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगावला हलविण्यात आले. उर्वरित दोघे किरकोळ जखमी झाले.

सविता पाटील यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ, पोलिस उपनिरिक्षक परशुराम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी प्रमोद कंखरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT