cleaning of Bhuikot Fort arranged on 30 july jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Bhuikot Fort : भुईकोट किल्ला होणार चकाचक! 5 जिल्ह्यातून येणार मावळे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bhuikot Fort : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर असलेल्या पारोळ्यातील भुईकोट किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी रविवारी (ता. ३०) पाच जिल्ह्यातील मावळे दाखल होत आहेत.

किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेत शहरातील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, पालिकेच अधिकारी, सफाई कर्मचारी व दुर्गप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत. (cleaning of Bhuikot Fort arranged on 30 july jalgaon news)

राजा शिवछत्रपती परिवार ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रातील गडकिल्यांची स्वच्छता व संर्वधनाचे काम करीत आहे. याच परिवाराचा जळगाव विभाग २०१९ पासून जिल्ह्यात कार्यरत आहे. या परिवारातर्फे विजयगड, कण्हेरगड, वेताळवाडी, अंतुर आदी किल्ल्यांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली आहे.

ज्यात किल्ल्यांवरील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करणे, गडावरील पाण्याच्या टाक्यांमधील गाळ काढणे, तटबंदीला धोकादायक ठरणारी खुरटी झुडपे काढणे यासोबतच दिवाळीला गडपूजन करणे, शिव जन्मोत्सव किल्ल्यांवर साजरा करणे आदी कार्यक्रम घेतले जातात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याशिवाय रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, दिवाळीत गरजूंना फराळ वाटप, शांळामध्ये उपयुक्त व्याख्यानांचे आयोजन, दिवाळीला शिव पुतळ्याजवळ दीपोत्सव असेही उपक्रम या परिवाराने राबवले आहेत.

याच जळगाव परिवाराची पन्नासावी सुवर्ण महोत्सवी मोहीम पारोळा येथील भुईकोट किल्ल्यावर रविवारी (ता.३०) आयोजित केली आहे. या मोहिमेला मराठा प्रीमियर लीग यांचेही सहकार्य लाभले आहे. या मोहिमेसाठी राजा शिवछत्रपती परिवाराच्या अकोला, बुलढाणा, नाशिक, धुळे व जळगाव परिवाराचे मावळे शहरात दाखल होणार आहेत.

शिवभक्तांनी या शिवकार्यास हातभार लावण्यासाठी रविवारी सकाळी नऊला किल्ला परिसरात उपस्थित रहावे, असे आवाहन पारोळा येथील परिवाराचे मावळे वासुदेव पाटील व किरण शिरसाठ यांनी केले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT