Anil Patil esakal
जळगाव

Jalgaon News : अमळनेरात फुटताय राजकीय श्रेयवादाचे फटाके; सर्वसामान्य जनतेची होतेय करमणूक

सकाळ वृत्तसेवा

आर. जे. पाटील : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : दिवाळीनंतरही अमळनेरात विशेषतः सोशल मिडीयावर राजकीय श्रेयवादाचे फटाके जोरात फुटत आहेत. पाडळसरे धरण, दुष्काळ जाहीर करणे तसेच अलिकडेच खासदार शरद पवार यांनी मंत्री अनिल पाटील यांना उद्देशून केलेल्या विधानामुळे ऐन थंडीत वातावरण चांगलेच गरम झाले आहे.

यामुळे सामान्य जनतेची मोठी करमणूक होत आहे.(common people are being entertained due to political point on social media jalgaon news)

अमळनेरात सध्या मंत्री अनिल पाटील यांची सोशल मिडीया टीम चांगलीच सक्रीय झाली आहे. मंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेली भरीव कामे मतदारांपर्यंत नेण्याचे काम या माध्यमातून ते करीत असले तरी माजी आमदार शिरीष चौधरी यांचा एक गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सचिन पाटील त्यांच्या सोबतीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनंत निकम यांचा गट आमदारांच्या विरोधात सक्रिय झाला आहे.

सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) देखील या रणांगणात उतरल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाच्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील केवळ चाळीसगाव तालुका समाविष्ट झाल्याने अमळनेर तालुक्यात नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात सोशल मिडीयावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या जात आहेत.

प्रत्येक पक्ष व गटाने दुष्काळ जाहीर करावा, यासाठी आंदोलने, निवेदने देण्याचे काम सुरू ठेवले आहे. नंतरच्या काळात राज्य सरकारने ९०० पेक्षा जास्त मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला. यात अमळनेर तालुक्यातील सर्व आठ मंडळांत दुष्काळ जाहीर झाल्याने सर्व गट व राजकीय पक्ष श्रेयवादाचा दावा करीत आहेत.

समितीचे अध्यक्ष तसेच मदत व पुनर्वसन मंत्री या नात्याने तालुक्यातील आठही मंडळात दुष्काळ जाहीर केल्याचा दावा अनिल पाटील समर्थक करीत आहेत. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याचे सांगत त्यांनी देखील श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर सचिन पाटील व अनंत निकम तसेच महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अर्धनग्न आंदोलनामुळेच शासनाने दुष्काळ जाहीर केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अशातच खासदार शरद पवार यांना सोलापूर येथील एका कार्यक्रमात मंत्री अनिल पाटील यांच्याबाबतीत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्याचाच धागा पकडत अमळनेरात सोशल मिडीयावर ऐन थंडीत वातावरण गरम झाले आहे.

मंत्री अनिल पाटील यांनी मतदारसंघात केलेली विकासाभिमुख कामे, त्यात प्रामुख्याने पाडळसरे धरणासाठी केंद्र व राज्य शासनाकडे त्यांचा सुरु असलेला सततचा पाठपुरावा यामुळे जनता पुन्हा आपल्याला निवडून देणार असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. एकूणच २०२४ हे वर्ष निवडणुकांचे असल्याने आतापासूनच प्रत्येक पक्ष व गट सक्रिय झाल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे.

‘पाडळसरे’च राजकारणाचा केंद्रबिंदू

अमळनेर तालुक्याच्या राजकारणात पाडळसरे धरण नेहमीच केंद्रबिंदू ठरला आहे. या धरणाच्या बाबतीत मतदारसंघात आता जोरदार चर्चा होत असून या संदर्भातील बैठकांनाही उधाण आले आहे.

पाडळसरे धरणाचा प्रश्न उचलला गेला, की लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत असे समजावे हे सर्वसामान्य जनतेचे मत जवळपास ३० वर्षांपासून तयार झालेले आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर या धरणाच्या गप्पागोष्टीत सामान्य जनतेला अजिबात रस नसून पाणी कधी अडवले जाईल याची ते वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT