Cotton Crop esakal
जळगाव

Cotton Crop Crisis : कापसाच्या वजनात होतेय घट अन् दर्जाही खालावतोय; शेतकरी कंटाळून आता कापूस विकणार!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कपाशीला किमान दहा हजारांचा दर मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी घरात साठविलेल्या कापसाला आता कीड लागून कापसाचे वजनही कमी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा तडाका वाढल्याने कापूस पूर्णता कोरडा होत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील कापसाचे भाव सात हजार ५०० ते आठ हजारदरम्यान आहे. अजून काही दिवस कापूस घरात ठेवला, तर वजनात घट होईल. त्यापेक्षा आता कापूस विकून मिळेल ते पदरात पाडून घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

८० ते ८५ टक्के कापूस अद्याप शेतकऱ्यांच्या घरात आहे. दुसरीकडे कापूस नसल्याने जिनिंग उद्योग धोक्यात आले आहेत. (Cotton Crop Crisis decrease in weight of cotton and quality also deteriorating Tired farmers will now sell cotton jalgaon news)

कापसाचे उत्पादन घेताना झालेला खर्च कापूस विकून काढायचा, असे शेतकऱ्यांनी ठरविले होते. मात्र दर दहा हजार नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस अद्यापपर्यंत विकलेला नाही.
बाजारात रोजची मागणी २० हजार गाठींच्या कापसाची आहे.

मात्र केवळ दोन हजार गाठींचा कापूस येत आहे. अजून किती दिवस कापसाचे दर कमी राहणार? सीसीआय बाजारात खरेदीस उतरत नाही.

जिल्ह्यात कापसाची टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यातील दीडशेपैकी केवळ ७५ जिनिंग प्रेसिंग मिल्स सुरू होत्या. आता त्यातील पन्नास जिनिंग बंद झाल्या आहेत. तर २५ जिनिंग बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

यंदा कापसाचे उत्पादन जास्त असले तरी ८५ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. कापसाला दहा ते तेरा हजारांचा दर होईल तेव्हा कापूस विकू, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे.

कापसाला गत वर्षी १३ ते १४ हजारांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. तो यंदाही मिळेल, या अपेक्षेने शेतकरी बाजारात कापूस आणत नसल्याचे चित्र आहे. मागील वर्षी कापसाला मिळालेला दर यंदाही मिळेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे.

मात्र आता गेल्या दोन महिन्यांपासून दरात वाढ होत नसल्याचे चित्र आहे. आता मिळेल त्या दरात कापूस विकण्याचे धोरण शेतकऱ्यांनी ठरविल्याचे सांगण्यात आले.

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या गाठींना मागणी कमी झाली आहे. सोबतच कापसाचे मोठे उत्पादन यंदा झाले आहे. व्यापारी कापसाचा दर्जा पाहून साडेसात ते आठ हजारांचा भाव देत आहे.

मात्र दर दहा ते तेरा हजार मिळाल्याशिवाय बाजारात कापूस आणणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. कापसाअभावी जिनिंग मिल्स सुरू राहू शकत नाहीत. सध्या ज्या जिनिंग सुरू आहेत त्या एका पाळीत सुरू आहेत.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

एखाद्या जिनमध्ये चारशे गाठी तयार होत असतील, तर त्यांना केवळ दोनशे गाठींचाच कापूस उपलब्ध होत आहे. दोनशे गाठी असूनही तयार करता येत नाही. अशीच स्थिती सर्व कारखान्यांची आहे.

कापसाच्या गाठी तयार करून त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी नाही. गाठी तयार करून कोणाला विकणार, असा प्रश्‍न जिनिंगचालकांसमोर आहे. एकंदरीत बाजारपेठेत येणारा कापूस बंद झाल्याने कापसाअभावी जिनिंग व्यवसाय धोक्यात आला आहे.

"कापूस घरात आहे, मात्र दर नाही. उत्पादन खर्च तर निघाला पाहिजे. मार्च महिन्यात दर वाढतील, अशी आशा होती. मात्र साठवून ठेवलेल्या कापसाचे वजन कमी होत आहे. दर्जाही खालावत आहे. तेव्हा कापूस आता विकला तर जो दर मिळेल तो पुढील वर्षी बघू. मात्र आता झालेला खर्च कसा निघेल, ते पाहतोय." - विजय झोपे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT