girl harrasment  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चुलत भावानेच केला बहिणीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : बहिण व भावाचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. रक्षाबंधन, भाऊबीजेला प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणाची व तिच्या सुरक्षित जीवनाची हमी घेत असतो. (cousin molested sister jalgaon crime news)

असे असताना पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात नराधम भावाने अल्पवयीन बहिणीशी अश्लील चाळे करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेली तेरा वर्षीय पीडित बालिका पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सुट्टीनिमित्त आजीकडे आली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोमवारी (ता. ५) दुपारी पीडित बालिका घरात झोपलेली असताना तिचा चुलत भाऊ घरात आला व अल्पवयीन चुलत बहिणीला एकटी झोपलेली पाहून त्याच्या मनात बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारे विचार आले.

त्याने अल्पवयीन चुलत बहिणीजवळ जाऊन तिचा विनयभंग केला व अतिप्रसंगाची जबरदस्ती केली. पीडितेने आपली सुटका करून घेत घडला प्रकार आपल्या नातलगांना सांगितला व पोलिसात तक्रार दिली.

त्या आधारे पोलिसांनी सैतानी मनोवृत्तीच्या तिच्या भावास अटक केली असून, पुढील तपास उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT