Crime against teacher for concealing letter change information in answer sheet jalgaon news esakal
जळगाव

HSC Exam : बारावी पेपर तपासणीत त्रुटी; शिक्षकांविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : फर्दापूर येथील राजकुंवर महाविद्यालयातील एका शिक्षकाने बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरमधील उत्तरपत्रिकेत अक्षर बदल असल्याची माहिती दडवून ठेवली, तसेच मुदतीच्या आत पेपर तपासणी न केल्याने सोयगाव गटशिक्षण अधिकारी रंगनाथ आढाव यांच्यामार्फत फर्दापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २५) सायंकाळी दोन्ही शिक्षकांवर शिक्षण मंडळाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime against teacher for concealing letter change information in answer sheet jalgaon news)

फर्दापूर व पिपळा येथील राजकुंवर महाविद्यालयातील दोन शिक्षकांकडे बारावीचे २०२३ चे भौतिकशास्त्र विषयाचे पेपर तपासणी आले होते.

त्यात अक्षर बदल असल्याचे शिक्षकाच्या लक्षात येऊनही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद यांना न कळवता उत्तरपत्रिका तपासणी केली असता उत्तरपत्रिकेत अक्षर बदल आढळून आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच १३ मार्चपर्यंत मुदतीच्या आत पेपर तपासून न देता ८ एप्रिलला उशिराने पेपर जमा करण्यात आले असल्याचे तसेच पेपरमधील अक्षर बदल असल्याचे मंडळाच्या लक्षात आल्याने त्यावर एक समिती भौतिकशास्त्र पेपरसंदर्भात नेमून चौकशी केली असता दोन्ही शिक्षक संशयित राहुल भगवानसिंग उसारे व मनीषा भागवत शिंदे यांना दोषी ठरवले असल्याने औरंगाबाद मंडळाच्या वतीने गटशिक्षण अधिकारी यांना आदेशानुसार गुरुवारी (ता. २५) या दोन्ही शिक्षकांविरुद्ध फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार मिरखा तडवी यांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: अयोध्येत राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न! विश्वस्त मंडळाकडून सुरक्षा व्यवस्थेत होणार मोठे बदल

विरोधात उभा रहायची हिंमत कशी केलीत? पिंपरीत भाजप कार्यकर्त्यांचा मध्यरात्री राडा, घरात घुसून शिवीगाळ

ताजमहालचे खास तळघर उघडणार! मोफत पाहण्याची एकमेव संधी; जाणून घ्या ३ दिवसांचे वेळापत्रक

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

SCROLL FOR NEXT