Rail (Dharangaon): Police Inspector Rahul Khatal etc. while taking information at the spot esakal
जळगाव

Crime News : वृद्ध महिलेचे कान कापून दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा

धरणगाव : तालुक्यातील रेल येथे एका वृद्ध महिलेचे कान कापून कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या आणि रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. २९) रात्री घडली.

या घटनेने ग्रामीण भागातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, धरणगाव पोलिसात (पाळधी दूरक्षेत्र) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल गावातील विमलबाई श्रीराम पाटील (वय ७०) या मंगल नथ्थू पाटील यांच्या घराच्या वरील पत्री शेडमध्ये एकट्या झोपलेल्या होत्या. (Cut off old woman ears and steal jewelry Jalgaon Crime News)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

त्यावेळी चोरट्याने त्यांच्या कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे, साधारण २५ हजार रुपये किमतीच्या सोनसाखळ्या (किल्लू) कान कापून तसेच डोक्यावर व तोंडावर दुखापत करून चोरुन नेले.सकाळचे नऊ वाजले तरी आजी खाली आल्या नाहीत म्हणून शेजारची महिला वर बघायला गेल्या. तेव्हा आजी रक्तबंबाळ अवस्थेत पडून होत्या.

घटनेची माहिती मिळताच वृद्ध महिलेचा नातू नीलेश मच्छिंद्र पाटील (रा. पिंप्री, ता. धरणगाव) घटनास्थळी पोहचले. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आजीजवळ साधारण ५० हजारांची रोकड असल्याचे देखील नीलेश पाटील यांनी सांगितले.

घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, चोपडा विभागीय अधिकारी ऋषिकेश रावले, अमळनेर विभागीय अधिकारी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक राहुल खताळ, अमोल गुंजाळ यांनी भेट दिली. या प्रकरणी पाळधी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor Martyrs: देशासाठी प्राणार्पण... ऑपरेशन सिंदूरमधील 'त्या' सहा शूरवीरांची ओळख अखेर उघड

Maharashtra Dahi Handi: गोविंदांसाठी खुशखबर! सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे संरक्षण, २ लाखांपर्यंत उपचार खर्च, विशेष विमा कवच लागू

Latest Marathi News Live Update : राममंदिरात दानचोरी आणि जमीन गैरव्यवहार प्रकरणात अध्यक्षांच्या राजीनाम्याची शक्यता

Ketan Agrawal Lohgad Case : सिया, चेतनच्या प्रेमाबाबत भावाचा पोलिसांकडे खुलासा, लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; साहिल गोयलची कसून चौकशी

Army Jawan Success : जिद्द असावी तर अशी! निवृत्तीनंतर साताऱ्याच्या माजी सैनिकानं एकाच वर्षात 'क्रॅक' केल्या तब्बल 12 सरकारी परीक्षा; एकामागून एक कशा दिल्या Exam?

SCROLL FOR NEXT