Bananas submerged in the garden of farmer Anil Patil. esakal
जळगाव

Jalgaon News : खेडीभोकरी शिवारात 400 हेक्टरवर नुकसान; पूर आला, पिके घेऊन गेला...!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : चोपडा तालुक्यातील खेडीभोकरी शिवारासह वटार, सुटकार, वडगाव व परिसरातील तापी काठच्या गावांना पुराचा फटका बसला असून, केळी, कापसासह सुमारे चारशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिला झाला आहे. (Damage on 400 hectares due to flood in Khedibhokri Shivar jalgaon news)

खेडीभोकरीसह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यात हतनूर धरणाचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तापी नदीला पूर आला. त्यात वडगाव, सुटकार, वटार, खेडीभोकरी येथील शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे.

प्रांताधिकाऱ्यांची भेट

चोपड्याचे प्रांतधिकारी एकनाथ बंगाळे, तहसीलदार रावसाहेब थोरात, सरपंच रणछोड पाटील, खेडी पोलिस पाटील घनश्याम पाटील, भोकरी पोलिस पाटील कैलास पाटील व तलाठी ग्रामसेवक व ग्रामस्थ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

खेडीभोकरी येथील अनिल भगवान पाटील, शिवाजी उधा पाटील, मच्छिंद्र पाटील, रामसिग पाटील, शालीक पाटील, युवराज पाटील, विनोद पाटील, युवराज देवसिंग पाटील, शिवाजी उत्तम पाटील, सुरेश पाटील, भिका पाटील, धनसिंग पाटील, यशोनाथ पाटील, रामा नारायण पाटील, झानेश्वर पाटील, चुनीलाल पाटील, चंद्रभान पाटील, सुनील पाटील, भिकारी वाघ, शाताराम वाघ, विजय वाघ, झानेश्वर वाघ, यशोनाथ वाघ, आदी खेडीभोकरीचे शेतकरी व वटार सुटकार व वडगाव बुद्रुक येथील शेकडो शेतकऱ्यांचे केळी व कापूस आदी पिकांचे लाखो रुपयाचे या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT