Chalisgaon: Police personnel taking deported Sarait criminal Dattatray Chaudhary for action. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चाळीसगावचा सराईतत गुन्हेगार दत्तात्रय चौधरी शहरातून हद्दपार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील सराईत गुन्हेगार दत्तात्रय ऊर्फ दत्तू मुकुंदा चौधरी (वय ३९, रा. महावीर व्यायाम शाळेजवळ, चाळीसगाव) याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन शहरातून हद्दपार करण्यात आले आहे.

येथील पोलिस ठाण्याला दोन वेळा खुनाचा प्रयत्न, चार वेळा गंभीर दुखापत, दोन वेळा साथीदारांना सोबत घेऊन दंगल करणे, असे एकूण आठ गुन्हे दाखल होते. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन देखील त्याच्या स्वभावात बदल झालेला नव्हता.(Dattatray Chaudhari notorious criminal of Chalisgaon was deported from city Jalgaon Crime News)

त्याची गुन्हे करण्याची साखळी सुरूच होती. त्याला विविध प्रकारचे गुन्हे करण्याची सवय असल्याने त्यास वेळोवेळी गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा गुन्हे करीत होता.

त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तो व आपल्या सोबत असणाऱ्या गुंडांसोबत घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भीती निर्माण करीत होता.

भविष्यात अशा प्रकारचे सराईत गुन्हे करून शहराची शांतता भंग करणारे तसेच शहरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध मोक्का, एमपीडीए, हद्दपार व इतर कठोर कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे दत्तात्रय ऊर्फ दत्तू मुकुंदा चौधरी याच्याविरुद्ध सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, पोलिस कर्मचारी योगेश बेलदार, विनोद भोई, तुकाराम चव्हाण, रवींद्र पाटील, दीपक पाटील, चत्तरसिंग महेर, प्रवीण जाधव यांच्या मदतीने हद्दपार प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Court Order : बांगलादेशी महिलांना परत पाठविण्याचे न्यायालयाचे आदेश; सात महिलांचा समावेश; बुधवार पेठेमध्ये करत देहविक्रीचा व्यवसाय!

IND vs SA T20I: हार्दिक पांड्याचे पुनरागमन निश्चित, शुभमन गिलबाबत अनिश्चितता; कधी जाहीर होणार भारताचा ट्वेंटी-२० संघ?

Latest Marathi News Live Update : बीड शहरातील शाहूनगर भागात दगडफेक

Cosmetic Gynecology: कामा रुग्णालयात लवकरच ‘कॉस्मेटिक गायनेकोलॉजी’; देशात सरकारी रुग्णालयात प्रथमच विभाग सुरु होणार

Gold-Silver Price: असं कसं झालं? सोन्या-चांदीचे भाव एवढे का घसरले? जाणून घ्या नवे दर

SCROLL FOR NEXT