Jalgaon District Bank
Jalgaon District Bank esakal
जळगाव

Jalgaon District Bank : जिल्हा बँकेतील राजकारण तापले; पुन्हा 15 ला होणार बैठक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १०) होणाऱ्या पहिल्याच बैठकीला १६ संचालकांनी दांडी मारल्याने ही बैठक तहकूब करावी लागली. ही तहकूब बैठक पुन्हा शनिवारी (ता. १५) होणार आहे. (district bank Adjournment of Board of Directors meeting for lack of quorum jalgaon news)

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गट, भारतीय जनता पक्षाच्या मदतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय पवार अध्यक्ष झाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांचा पराभव झाला. हा पराभव आमदार एकनाथराव खडसे यांच्यासाठी मोठा धक्का ठरला. त्यामुळे संचालक मंडळात मोठे राजकारण चालणार असल्याचे संकेत मिळाले होते, त्याचा प्रत्यय सोमवारी आला.

१६ संचालक अनुपस्थित

अध्यक्ष निवडीनंतर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची पहिलीच बैठक सोमवारी (ता. १०) दुपारी दोनला होती. बैठकीत पीक कर्जवाटप, वसुली यांसह शेतकरी हिताचे विषय चर्चेसाठी होते. मात्र, बैठकीकडे तब्बल १६ संचालकांनी पाठ फिरविली. यात शिंदे गटाचे तीन संचालक आमदार अयोध्या येथे गेल्याने ते अनुपस्थित राहिले.

बैठकीसाठी अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्यासह संचालक मेहताबसिंग नाईक, प्रताप हरी पाटील, शैलजा निकम, जनाबार्ई महाजन, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते. बैठकीसाठी ११ संचालकांचा कोरम आवश्‍यक होता. हा कोरम पूर्ण न झाल्याने ही बैठक तहकूब करण्यात आली.

अनुपस्थितीसाठी संचालकांवर नेत्यांचा दबाव : संजय पवार

अध्यक्षपदाच्या निवडीत झालेला पराभव जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना जिव्हारी लागला. त्यामुळे जिल्ह्यातील दोन मोठ्या नेत्यांनीच इतर संचालकांना फोन करून दबाव आणत संचालक मंडळाच्या बैठकीला जाण्यास मज्जाव केल्याचा आरोप बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. बैठकीत शेतकरी हिताच्या विषयांवर चर्चा होणार होती. मात्र, बैठकीला न येणे म्हणजेच शेतकरी हिताला विरोध आहे, असे दिसून येते.

होय, मीच संचालकांना रोखले : आमदार खडसे

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीसाठी कोरम पूर्ण करण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे. आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे बैठकीला जायचे की नाही, हे आमचे आम्ही ठरवू. सोसायट्यांना थेट पतपुरवठा या विषयावरून अनेकांची नाराजी आहे.

त्यामुळे मीच संचालकांना फोन करून बैठकीला जाऊ नका, असे सांगितल्याची माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली. सत्ताधारी संचालक सहकारी अयोध्येला वारी करीत आहेत. शेतकऱ्यांपेक्षा अयोध्येची वारी त्यांना महत्त्वाची वाटली का, असा सवालही त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT