District Collector prasad statement about Meri Mati Mera Desh initiative jalgaon news esakal
जळगाव

Meri Mati Mera Desh Initiative : ग्रा. पं. स्तरावर राबविणार ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम : जिल्हाधिकारी प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Meri Mati Mera Desh Initiative : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या १५ ऑगस्टला होत आहे. त्यानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ या संकल्पनेला जनमाणसांपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोचविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

त्या अंतर्गत राज्य शासनाच्या निर्देशांनुसार जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन करीत आहे. नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. (District Collector prasad statement about Meri Mati Mera Desh initiative jalgaon news)

जिल्हाधिकारी प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित व शासकीय विभागाच्या समन्वयातून हा उपक्रम अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत शिला फलक उभारण्यात येणार आहेत.

ज्यांनी निःस्वार्थपणे देशाची सेवा केली व ज्यांनी बलिदान दिले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून बुधवार (ता. ९)पासून १५ ऑगस्टपर्यंत श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. या अभियानात देशाचा स्वाभिमान जपण्यासमवेत नागरिक म्हणून आपली कर्तव्य भावना व जागरूकता वृद्धींगत व्हावी यासाठी पंचप्रण प्रतिज्ञा गावोगावी घेतली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

स्वातंत्र्य सैनिक, निवृत्त संरक्षण कर्मचारी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी, राज्य पोलीस दलाचे कर्मचारी यांना सन्मानित करून कृतज्ञता व्यक्त केली जाईल. तसेच, पुढील पिढ्यांसाठी साक्षीदार ठरतील अशी दीर्घकाळ टिकणारी ७५ वृक्षांचे रोपन करून एक वेगळा संदेश गावोगावी दिला जाणार आहे.

राजधानीत अमृत वाटिका

प्रत्येक गावातील माती एका कलशातून एकत्र करून ती राजधानी दिल्ली येथे कर्तव्यपथावर अमृत वाटिकेसाठी पाठविण्यात येईल. २७ ते ३० ऑगस्ट या कालावधीत हा कलश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी तालुकास्तरावरील प्रथीतयश युवकांच्या हस्ते पाठविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT