post
post esakal
जळगाव

Triple Talaq : पोस्टाद्वारे ट्रीपल तलाकने घटस्फोट देण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : केंद्र सरकारने ट्रीपल तलाकवर बंदी आणून नवीन कायदा केला असताना, काही प्रकरणात अद्याप ही अनिष्ठ प्रथा सुरू आहे. (divorce by post with triple talaq Police registered case against 9 people jalgaon news)

धुळ्यातील रहिवासी पतीने जळगावातील माहेरवाशीण पत्नीस ‘तलाक तलाक तलाक’, असा मजकूर रजिस्टर पोस्टाने पाठवून घटस्फोट देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसांत नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील ३५ वर्षीय विवाहितेचे २०१९ मध्ये लग्न धुळ्यातील तरुणाशी झाले. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ करण्यास सुरवात केली. भंगारच्या व्यवसाय वाढीसाठी पत्नीकडे दहा लाख रुपये मागितले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

विवाहितेने माहेरहून पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. एवढेच नव्हे, तर गर्भवती असताना, पतीने पोटात लाथ मारल्यामुळे विवाहितेच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाला. त्यामुळे विवाहिता माहेरीच राहत होती.

नंतर तिच्या पतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवून ‘तलाक तलाक तलाक’ असे लिहून घटस्फोट देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: करोडोंची कार वापरणाऱ्या अग्रवालने सतराशे रुपयांसाठी रखडवलेले पोर्शेचे रजिस्ट्रेशन

Covid: सिंगापूरनंतर भारतातही परसरला कोरोनाचा नवा प्रकार; 300 हून अधिक लोकांना संसर्ग

Nigeria Firing: अमानुष! बंदुकधाऱ्यांच्या हल्ल्यात ४० लोक ठार; पीडित म्हणाले, त्यांनी आमची...

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

SCROLL FOR NEXT