Jalgaon: Shiv Sena Division Chief Vijay Bandal and Shiv Sainik giving a statement to Leader of Opposition Sunil Mahajan regarding road work in Shivaji Nagar esakal
जळगाव

Jalgaon News : रस्त्याचे काम करा, अन्यथा रास्ता रोको; शिवसेनेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिवाजीनगरातील लाकूड पेठपासून तर थेट टी. टी. साळुंखे चौक रस्ता दुरुस्तीबाबत महापालिकेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी आश्‍वासन दिले होते. मात्र, अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

शिवाय दूध फेडरेशन रस्त्याच्या कामातही दिरंगाई होत आहे. तातडीने या रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवाजीनगर शिवसेनेने दिला आहे. (Do road work otherwise block road Shiv Sena warning Statement to mayor Jalgaon News)

महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शिवाजीनगरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पावसाळ्यात आंदोलन केले होते. त्यावेळी पावसाळ्यानंतर तातडीने या रस्त्याचे काम करण्यात येईल, असे आश्‍वासन पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी दिले होते.

मात्र, पावसाळा जाऊन तीन महिने झाले, तरी या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने करण्याची गरज आहे.

फेडरेशन रस्त्याची दिरंगाई का?

शिवाजीनगर पूल ते दूध फेडरेशन रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार अत्यंत संथ गतीने काम करीत असून, दोन महिन्यांपासून त्याचे काम सुरू आहे. मक्तेदाराने ते खोदून ठेवले आहेत. त्याचे कामही करण्यास तो तयार नाही. मक्तेदारास वेगाने काम करण्याबाबत नोटीस द्यावी, अशी मागणीही केली आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

तीन दिवसांनंतर आंदोलन

शिवाजीनगरातील या रस्त्याचे काम तीन दिवसांत सुरू झाले नाही, तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. शिवाजीनगर विभागप्रमुख विजय बांदल यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर विनोद तायडे, जावेद शेख, राजू सय्यद, सुनील निकम, केशव जानभरे, कैलास गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT