earthquake
earthquake esakal
जळगाव

Breaking News : जळगाव जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये दहशत

देविदास वाणी

जळगाव : जिल्‍ह्यातील भुसावळ शहर व सावदा परिसरात आज सकाळी भुकंपाचे सौम्‍य धक्‍के बसले. यामुळे नागरीकांमध्‍ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्‍हा प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार जळगाव जिल्‍ह्यातील भुसावळ व सावदा परिसरात सकाळी 10 वाजून 35 मिनिटांच्‍या सुमारास भुकंपाचे सौम्‍य धक्‍के जाणवले. रेक्‍टर स्‍केलवर ३.३ ऐवढी तिव्रता नोंदली गेली.

शहरातील गडकरीनगर ग्रीन पार्क, विठ्ठलमंदिर वार्ड, शनि मंदिर वार्ड, वांजोळा रोड, बाजारपेठ परिसरातही दीड सेकंदाचे भुकंपाचे धक्‍के बसल्‍याचे नागरीकांनी सांगितले. शहरात या चर्चेला उधाण आले होते. (Earthquake shocks in Jalgaon district Terror among citizens jalgaon Breaking News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

काही घरांमध्‍ये पडले भांडे

भुसावळ शहरातील श्रीरामनगर परिसरातील इमारतीतील नागरीक बाहेर पडत आले. तर राहुल नगरातील काही घरांमध्‍ये भांडे खाली पडल्‍याची माहिती समोर आली आहे. केशरनगरमध्‍ये देखील दरवाजे हलत असल्‍याने नागरीक घाबरले होते. यामुळे घाबरून नागरीक बराच वेळ घराच्‍या बाहेर थांबून होते. ज्‍या भागात भांडे पडले होते, तेथे नागरीक पहाण्यासाठी जमा झाले होते.

काळजी घेण्याचे आवाहन

भुसावळ सावदा येथे भूकंपाचे धक्के बसले ची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली असून, नागरिकांनी घाबरून जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT