Eknath Khadse News esakal
जळगाव

Eknath Khadse News : मुक्ताईच्या कृपेने ‘कार्डियाक ॲरेस्ट’मधून वाचलो; मुख्यमंत्र्यांचेही मानले आभार

सकाळ वृत्तसेवा

Eknath Khadse News : ॲन्जिओप्लास्टी केली. डॉक्टरांनी दुसऱ्या बेडवर शिफ्ट केले. पण त्याचवेळी पुन्हा त्रास होऊन हृदय बंद पडले. ‘कार्डियाक ॲरेस्ट’मुळे हृदय बंद पडून ऑक्सिजन लेव्हल डाउन झाली. डॉक्टरांनी तातडीने ‘शॉक ट्रीटमेंट’ दिली. त्यातून हृदय पुन्हा सुरू झाले.

मुक्ताईच्या कृपेने वाचलो, असा अनुभव शेअर करत एकनाथ खडसे यांनी याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचेही आभार मानले.( Eknath Khadse thanked to Chief Minister Eknath Shinde jalgaon news )

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांना गेल्या आठवड्यात छातीत दुखू लागल्याने जळगावातील डॉ. विवेक चौधरी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक तपासणीनंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्याचे ठरले.

एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था होत नव्हती, अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या वैद्यकीय यंत्रणेला सूचना देऊन व्यवस्था केली व खडसेंना बाँबे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

चमत्कारातूनच वाचलो..!

उपचाराबद्दल बोलताना खडसे म्हणाले, की ॲन्जिओग्राफीतून हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या दोन वाहिन्यांमध्ये १०० टक्के, तर एका वाहिनीत ७० टक्के ब्लॉकेज आढळून आले. तज्ज्ञांनी ॲन्जिओप्लास्टीचा निर्णय घेतला. स्टेंट टाकण्याची शस्त्रक्रिया पार पडली.

मात्र, लगेच ‘कार्डियाक ॲरेस्ट’ येऊन हृदय बंद पडले. सर्व काही संपल्यात जमा होते. पण, तज्ज्ञांनी पुन्हा शर्तीचे प्रयत्न करत शॉक ट्रीटमेंट दिली. त्यातून मुक्ताईच्या आशीर्वादाने चमत्कार झाला अन्‌ हृदय पुन्हा सुरू झाले. आता मी पूर्णपणे ओके आहे, असे खडसे ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले.

...तर माझे ‘टेक ऑफ’च झाले असते

उपचारानंतर खडसेंचा मुख्यमंत्र्यांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे एअर ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. उपचाराबद्दल माहिती देतानाच आपण एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था केली नसती, तर माझे ‘टेक ऑफ’ झालेले विमान लॅन्डच होऊ शकले नसते,’ असे खडसे शिंदेंना सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT