he trustees of the temples while presenting various demands to Chief Minister Eknath Shinde esakal
जळगाव

CM Eknath Shinde | मंदिरांच्या समस्यांबाबत लवकरच स्वतंत्र बैठक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महाराष्ट्रातील मंदिरांच्या विविध समस्यांविषयी सरकार गंभीर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व मंदिरांच्या समस्या सोडवण्याविषयी संबंधित अधिकारी, मंदिर विश्‍वस्त, पुजारी यांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. (eknath shinde statement about separate meeting on temple issue jalgaon news)

मंदिर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच विधानभवनात झाली. या वेळी मंदिरांच्या विश्‍वस्तांनी विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्र्यांनी मंदिर विश्‍वस्तांच्या मागण्यांची गंभीरपणे नोंद घेतली आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक तथा हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली.

दरम्यान, ४ व ५ फेब्रुवारीला जळगाव येथे झालेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त मंदिरांचे संवर्धन आणि संरक्षण यांसाठी विविध ठराव संमत करण्यात आले होते. त्या अनुषंगाने महासंघातर्फे हे ठराव मुख्यमंत्र्यांना सादर करून त्यावर कार्यवाहीची मागणी या बैठकीत करण्यात आली.

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थान, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थान, मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिर आदी सरकारीकरण झालेल्या मंदिरांत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असून, त्याची शासनाकडून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

ज्या ज्या मंदिरांवर प्रशासक वा न्यायाधीश यांची नेमणूक झालेली आहे, ती सर्व मंदिरे पुन्हा हिंदूंच्या नियंत्रणात देण्यात यावी, या संदर्भात स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन या वेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

शिष्टमंडळात श्री. घनवट यांच्यासह राज्याचे बंदरे आणि खनिकर्ममंत्री दादा भुसे, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, श्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थानचे अध्यक्ष अधिवक्ता सुरेश कौदरे, सहकार्यकारी विश्‍वस्त मधुकर गवांदे, श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, नाशिकच्या श्री काळाराम मंदिराचे आचार्य महामंडलेश्‍वर श्रीमहंत सुधीरदास महाराज,

जीएसबी टेम्पल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋत्विक औरंगाबादकर, अमळनेर येथील श्री मंगळग्रह सेवा संस्थानचे अध्यक्ष दिगंबर महाले, वडज देवस्थानचे आदिनाथ चव्हाण, नगर येथील श्री भवानीमाता मंदिरचे अधिवक्ता अभिषेक भगत, श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, जळगावचे आमदार सुरेश भोळे, आमदार किशोर पाटील, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT