encroachments on a large scale creating hindrance to traffic chalisgaon jalgaon news
encroachments on a large scale creating hindrance to traffic chalisgaon jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : चाळीसगावातील मोहिमेनंतरही अतिक्रमणाची डोकेदुखी कायम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गेल्या एक-दीड महिन्यापासून पालिकेने शहरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे.

मात्र, जुन्या चाळीसगावातील बाजारपेठ, रथगल्ली व नवीन पूल यासह गणेश रस्ता, घाट रस्ता या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे असून, यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या ठिकाणचेही अतिक्रमण काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (encroachments on a large scale creating hindrance to traffic chalisgaon jalgaon news)

(स्व.) भास्करराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी चाळीसगावातील अतिक्रमणे काढताना सर्वप्रथम जुन्या नगरपालिकेजवळील रथगल्ली, जुन्या पुलाजवळील, घाटरोडवरील अतिक्रमणे काढण्यास त्यावेळी प्रशासनातील तहसीलदार व पालिकेचे मुख्याधिकारी यांना आदेश करून पोलिसांची मदत घेण्यास सांगितले होते.

अशाच प्रकारचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी स्थानिक प्रशासनास द्यावे. तसेच हा रस्ता एकमार्गी (वन वे) रस्ता करावा, अशी बऱ्याच वर्षांपासूनची मागणी आहे.

या रस्त्यावरील वाहतुकीची समस्या लक्षात घेता वाहतूक पोलिसांची सकाळी नऊ ते बारा व दुपारी पाच ते सात अशी ड्यूटी लावावी, अशी नागरिकांची मागणी आहे. यासंदर्भात जागरूक नागरिकांनी पोलिस खात्याला यापूर्वी देखील पत्रव्यवहार केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गणेश रस्त्यावर सुद्धा तीच परिस्थिती आहे. गणेश मंदिराचा बराचसा भाग अतिक्रमाणात आहे. त्यामुळे जवळपासच्या दोन्ही बाजूच्या दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे.घाटरोड रस्त्यावर सुद्धा वाहने निघणे अवघड होऊन गेले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विजेचे खांब देखील रस्त्याच्या मधोमध नाहीत. त्यामुळे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

जळगाव ते चांदवड राज्य महामार्गाच्या कामात भडगाव बसस्थानकापासून नवीन हिरापूर नाक्यापर्यंत अतिक्रमण असल्याने त्या दरम्यान, हा महामार्ग सोडून द्यावा लागला होता. धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, चाळीसगाव न्यायालयापासून ते घाटरोड, शिवाजी चौकातील आजूबाजूच्या अतिक्रमणात असलेली दुकाने निघण्याची दाट शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT