Farm News esakal
जळगाव

Jalgaon News : अखेर सावकारीतुन सुटका; शेतकऱ्यांच्या नावावर शेती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रावेर तालुक्यात १२ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सावकाराने अवैधरीत्या बळकावल्या होत्या. त्या जमिनी त्याच्या ताब्यातून सोडवून मूळ शेतकऱ्यांना परत करण्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी दिले होते.

त्यानुसार त्या शेतजमिनी रावेर महसूल विभागाने संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर केल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शुक्रवारी (ता. ३०) दिली.

रावेर तालुक्यातील दोन गावांत सावकारांच्या महसूल नोंदी रद्द करून सातबारा उताऱ्यांवर १२ शेतकऱ्यांच्या नावे लावून ताबा देण्याची कार्यवाही करण्यासाठी महसूल विभागाकडून अडवणूक करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २९) जिल्हाधिकारी मित्तल यांची भेट घेतली होती. त्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमिनी करण्याचे रावेर तहसील विभागाला सांगितले असल्याचे श्री. मित्तल यांनी सांगितले. (Escape from money lending Farming in name of farmers Collector aman mittal action Jalgaon News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

रावेर व यावल तालुक्यातील १५ शेतकऱ्यांच्या ९६ एकर शेती सावकारी अधित नियमातंर्गत आठ सावकारांच्या कचाट्यातून जिल्हा उपनिबंधक बिडवई यांनी ३० नोंव्हेबर २०२२ ला बाहेर काढून शेतकऱ्यांना परत केली होती. त्याबाबतचे आदेश पत्रही शेतकऱ्यांना देऊन संबंधित तलाठी, तहसीलदारांनाही पत्र पाठविले होते.

सावकाराने घेतलेल्या शेतजमिनी शेतकऱ्यांना परत देण्याचे पत्रात म्हटले होते. मात्र, महसूल प्रशासन त्यावर कार्यवाही करीत नव्हते. यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्याबाबत माहिती दिली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना वरीलप्रमाणे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT