Expert advice sun burning heat stroke mercury 44 degrees sakal
जळगाव

Heat Stroke : उष्माघाताचे रुग्ण वाढले; वेळीच उपचार घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा ४५ अंशांवर गेला असताना, जिल्ह्यात उष्माघाताचे रुग्ण वाढून मृत्यूही होतोय. त्यामुळे या वाढत्या तीव्र उन्हात बाहेर पडताना प्रत्येकाने जरा जपून, योग्य काळजी घेऊनच बाहेर पडले पाहिजे. (Experts advise heat stroke patients to seek treatment as soon as possible jalgaon news)

देशभरात सर्वाधिक ‘हॉट सिटी’ म्हणून यंदा दोनवेळा जळगाव शहरातील तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवड्यात जळगावच्या तापमानाचा पारा ४७ अंशांपर्यंत पोचला. त्यामुळे काही दिवसांपासून उष्माघाताचे रुग्ण वाढू लागले आहेत.

कशामुळे होतो उष्माघात?

शरीरातील सामान्य तापमान ३७ अंश सेल्सिअस असते. मात्र, बाहेरील तापमान वाढते आणि व्यक्‍ती त्याच्या संपर्कात अधिक येतो, तेव्हा मेंदूतील हायपोथॅलोमसचे शरीरावरील नियंत्रण सुटते. परिणामी, रक्‍तातील प्रथिने उकळायला लागल्याने रक्‍त घट्ट होते. त्यामुळे मेंदूला रक्‍तपुरवठा होत नाही. मेंदूचे शरीरावरील नियंत्रण सुटून मेंदूला इजा होते व त्यातच व्यक्‍तीचा मृत्यू होतो.

अशी आहेत लक्षणे

अशक्‍तपणा, चिडचिडेपणा, प्रचंड डोकेदुखी, अस्वस्थतता, घाम न येणे, उलट्या होणे, अतिसार, श्वासोच्छवासास त्रास होणे. त्यातून झटके येणे, ग्लानी येणे, रुग्ण बेशुद्ध होतो, एकेक इंद्रिय निकामी होतात व प्रसंगी मृत्यू ओढवतो.

असे कराल उपाय

शरीरातील पाण्याचे बाष्पीभवन होते. यासाठी उन्हाळ्यात थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे. शेतकऱ्यांसह बाहेर काम करणाऱ्यांनी सकाळी सहा ते अकरा या वेळेतच काम करावीत. सुती कपडे, गमछा, टोपी घालावी. ताक-दही-लिंबू सरबत घ्यावे.

पातळ पदार्थांचे सेवन करावे. अतिव्यायाम करू नये, शक्यतो सकाळी लवकर व सायंकाळी, अशा वेळेत नेहमीपेक्षा कमी किंवा हलका व्यायाम करावा. शीतपेय, तिखट-मसालेदार पदार्थ व मांसाहार करू नये. शिळे अन्न खाऊ नये. बाहेरील बर्फयुक्‍त वस्तू घेऊ नयेत, त्याद्वारे संसर्ग होऊन कावीळ, टायफाईड, गॅस्ट्रो होण्याची शक्यता असते.

अन्य आजार असलेल्यांसाठी

लहान मुले, दीर्घकाळ आजारी व्यक्‍ती, पाणी कमी पिणारे, दारूचे व्यसन असणारे, स्थूल शरीर, मधुमेह, रक्‍तदाब, श्वसनविकार, हृदयविकार, यकृताचे आजार असलेल्या रुग्णांनी अधिक पाणी प्यावे.

हे त्वरित करा

ऊन लागल्याचे आढळून आल्यास त्या व्यक्‍तीला सावलीत न्यावे, तोंडावर पाणी शिंपडावे, त्याचे कपडे सैल करावेत, हळूहळू पाणी प्यायला द्यावे.

यानंतरही ज्यावेळी तीव्र उन्हाचा फटका बसला असल्यास व्यक्‍तीचे स्नायू कडक होतात आणि श्वसनास त्रास होतो, त्या वेळी वरील प्रथमोपचार करून जवळच्या रुग्णालयात हलवावे.

"उष्माघाताचा त्रास झालेल्या रुग्णांवर तातडीने प्राथमिक उपचार करावेत. त्रास अधिक असल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल व्हावे. डॉ. उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला असून, तज्ज्ञ डॉक्टर २४ तास रुग्णांवर लक्ष ठेवून असतात." -डॉ. चंद्रेय्या कांते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT