The police detained the fake officer. This time Vishnu Awad, Sheetal Nagarle, Prakash Chavanke and police personnel.  esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : तो करत होता शाळेतील मुलांना वह्यावाटप; ‘खाक्या’ दाखविताच लागला बोलू..

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : वन विभागात सीसीएफ असल्याची बतावणी करीत एका शाळेत मुलांना वह्या वाटपासाठी आलेल्या तोतया वन अधिकाऱ्याला गजाआड करण्यात आले.

या तोतया अधिकाऱ्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्याला आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. (fake Forest Officer arrested in jamda jalgaon fraud crime)

चाळीसगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे या गुरुवारी (ता. २०) दुपारी पावणेतीनच्या सुमारास कार्यालयात कामकाज करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की जामदा (ता. चाळीसगाव) येथील माध्यमिक विद्यालयात सीसीएफ (चीफ कॉन्जरवेटिव्ह फॉरेस्ट) अधिकारी शाळेतील मुलांना वह्यावाटपाच्या कार्यक्रमास आले आहेत.

...अन् अशी आली शंका

जामदा येथील शाळेत एवढ्या मोठ्या हुद्याचे अधिकारी आपल्या हद्दीत कार्यक्रमासाठी आले आहेत व आपल्या कार्यालयाला त्यांचा कोणताही शासकीय कार्यक्रम माहीत नाही. त्यावरून नगराळे यांना शंका आल्याने त्यांनी ही बाब मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विष्णू आव्हाड यांना कळविली. त्यांनी गुप्त माहिती घेत सापळा रचला.

जामदा गाठले

चाळीसगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी या ठिकाणी पोलिस कर्मचारी पाठविण्याची विनंती केली. वन विभागाच्या कार्यालयातील सी. व्ही. पाटील (वनपाल, जुवार्डी), जी. एस. पिंजारी (वनपाल, घोडेगाव), राहुल पाटील (वनरक्षक, शिवरे), एम. पी. शिंदे (वनरक्षक, पश्चिम जुवार्डी) यांनी तत्काळ जामदा गाठले. त्याचवेळी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, प्रताप मथुरे, ईश्वर देशमुख, संजय लाटे, नीलेश लोहार आदी सहकारी तेथे पोचले.

घरी जायला निघाला अन्...

याच वेळी माध्यमिक विद्यालय, जामदा शाळेच्या गेटमधून एक व्यक्ती बाहेर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी नगराळे यांनी विचारणा केली असता त्याने मी फॉरेस्ट अधिकारी आहे व जामदा शाळेत वह्यावाटपाच्या कार्यक्रमास आलो होतो. कार्यक्रम संपवून घरी चाललो, असे सांगितले.

या व्यक्तीबाबत संशय आल्याने शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव ठोके यांना भेटून याबाबत विचारले असता आलेल्या व्यक्तीने आपले नाव नितीन रवींद्र पगारे (रा. बहाळ, ता. चाळीसगाव) असे असून, मी वन विभागात सीसीएफ पदावर नाशिक येथे कार्यरत असून, शाळेतील मुलांना वह्यावाटप करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.

‘खाक्या’ दाखविताच बोलू लागला..

या सर्व प्रकाराची माहिती शीतल नगराळे यांनी वरिष्ठ कार्यालयात फोन करून चौकशी केली असता अशा कोणत्याही नावाची व्यक्ती विभागात कार्यरत नसल्याची माहिती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे संशयित नितीन पगारे यास पुढील चौकशीकामी मेहुणबारे पोलिस ठाण्यात आणून पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने मी वन विभागात कोठेही कोणत्याही पदावर कार्यरत नाही.

परंतु, मी लोकांना फॉरेस्ट अधिकारी असल्याचे सांगून वावरत असतो, अशी कबुली दिली. त्याच्याविरुद्ध वनपरिक्षेत्र अधिकारी नगराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रताप मथुरे तपास करीत आहेत.

"वन विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून संशयित नितीन पगारे याने वन विभागात नोकरीस लावून देतो, अशी बतावणी करून पैसे उकळले असल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकारची कुणाची फसवणूक झाली असल्यास तत्काळ आमच्याशी संपर्क साधून तक्रार करावी." - विष्णू आव्हाड, सहाय्यक निरीक्षक, मेहुणबारे (ता. चाळीसगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : खासदर शोभाताई बच्छाव यांचा पाचोरा तालुक्यातील पाहणी दौरा पूर्ण

Akola News : आरक्षण जाहीर! कुठे धक्का तर कुठे मिळाली संधी; जिल्ह्यातील पाच नगराध्यक्ष पदांवर महिलाराज

Kannad Nagarparishad Election : कन्नड नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; शहरात ‘भावी वहिनीसाहेब’ ताईसाहेब चर्चेत

SCROLL FOR NEXT