Closed shops of Krishi Kendra. esakal
जळगाव

Jalgaon News : कृषी विक्री केंद्रांचा कडकडीत बंद; शेतकऱ्यांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा संघटनेने पुकारलेल्या बंदला साथ देत तालुका संघटनेने गुरुवारपासून तीन दिवस आपली कृषी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यात आज पहिल्या दिवशी सर्व कृषी केंद्र कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.

लाखो रुपयांचा होणारा कृषी व्यवसायाची उलाढाल आजरोजी थांबल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. ( Farmers are inconvenienced by strict closed of agricultural shop jalgaon news )

याबाबत कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले, की कृषी विक्रेता शेतकऱ्यांचा सच्चा मित्र आहे. प्रामाणिक व्यापारी आहे. परंतु शासनाने सरसकट कृषी व्यापाऱ्यांना संशयाच्या नजरेतून पाहिल्याने त्यांच्यावर आता मंजूर होत असलेले नियम ४०, ४१, ४२, ४३, ४४ हे अतिजाचक आहेत.

याचा शासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली आहे. दरम्यान, शहरात सर्वच कृषी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी लागणारे रासायनिक खते तसेच औषधी न मिळाल्यामुळे त्यांनी माघारी जावे लागले.

रावेरला बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

तालुक्यातून बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सर्वच म्हणजे २१० खासगी आणि १५ संस्थांच्या अशा एकूण २२५ कृषी केंद्रांनी कडकडीत बंद पाळला. प्रस्तावित कृषी विधेयका विरोधात माफदा संघटनेचे हे ३ दिवसीय बंद आंदोलन असून त्याला राज्यभरातील कृषी विक्रेत्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT