Cooperative Sugar Factory. esakal
जळगाव

Jalgaon News : अखेर ‘चोसाका’कडील रक्कम शेतकऱ्यांना मिळणार; 3 कोटी 30 लाखांचे टप्पाटप्प्याने वाटप

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक ३ हजार ३६ शेतकऱ्यांची २०१४-१५ चे ऊस बिलातील ठेव म्हणून ठेवलेली रक्कम १५० रुपये प्रतिटनप्रमाणे ३ कोटी ३० लाख रुपये तब्बल आठ वर्ष उलटूनही मिळत नव्हते.

यावर शेतकरी कृती समितीचे सदस्य तथा ‘चोसाका’चे उपाध्यक्ष एस. बी. पाटील यांनी आत्मक्लेश आंदोलन केले होते. (farmers will get amount from Chosaka jalgaon news)

याची दखल घेत सर्वपक्षीय नेत्यांनी, चोसाका अध्यक्ष, संचालक मंडळ यांनी यावर मार्ग काढून बारामती ॲग्रोकडे ठराव पाठवून अखेर चोसाकाला ३ कोटी ३० लाख रुपये प्राप्त झाले असून, सदर रकमेचे टप्पाटप्प्याने वाटप होणार असल्याची माहिती चोसाका अध्यक्ष चंद्रहास गुजराथी यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांचे २०१४-१५ चे राहिलेले १५० रुपये प्रतिटन प्रमाणे ३ कोटी ३० लाख रुपये जून २०२३ ला देऊ, ते आपणास मिळालेत, असे कारखान्याला लिहून दिले व त्याची ठेव केली तर कारखाना भाडेतत्त्वावर दिला जाईल, असे बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी सांगितल्याने शेतकऱ्यांनी तो निर्णय मान्य केला होता.

दरम्यान, २०१४-१५ ची शेतकऱ्यांचे ही ठेव म्हणून ठेवलेली रक्कम जून २०२३ अखेर मिळणार होती. याबाबत बारामती ॲग्रोनेही सकारात्मक भूमिका देखील घेतली. परंतु कुणीतरी हा प्रश्न चिघळावा म्हणून बारामती ॲग्रो आणि संचालक मंडळ यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून, शेतकऱ्यांना मिळणारे पैसे मिळण्यास विलंब होत आहे.

यावर कोणताही निर्णय होत नसल्याने शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले होते. मात्र सर्वपक्षीय नेते यात विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, चोसाका माजी अध्यक्ष ॲड. घनश्याम पाटील, जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, संचालक मंडळ यांच्या प्रयत्नाने अखेर बारामती ॲग्रोने पैसे दिल्याने शेतकऱ्यांची थकीत रकमेचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठराव दिल्याने मार्ग मोकळा

बारामती ॲग्रोने या रकमेसाठी नवीन संचालक मंडळाने ठराव करून द्यावा, अशी मागणी बारामती ॲग्रोने केली होती. यानुसार अध्यक्ष चंद्रहास गुजराथी यांनी संचालक मंडळास विश्वासात घेत यातून काही मार्ग काढता येईल का? यावर निर्णय घेत ठराव दिला व मार्ग सुकर झाला.‘चोसाका’कडील थकीत रक्कम मिळाल्याने आता शेतकऱ्यांची चोसाकाकडे कोणतीही रक्कम अथवा पेमेंट थकीत नाही. आता फक्त कामगारांचे थकीत वेतन, पीएफ, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे यांचा प्रश्न लवकर सोडविणे आवश्यक आहे.

''सर्व संचालक व ऊस उत्पादक सभासद, बारामती ॲग्रोकडून आजरोजी ३ कोटी ३० लाख रुपये बुलढाणा अर्बंनच्या चोसाकाच्या खात्यात जमा झाले आहेत. शेतकऱ्यांचे १५० प्रमाणे देणे पुढच्या आठवड्यात सोमवारपासून बुलढाणा अर्बन येथून प्रत्येकाच्या खात्याला जमा होतील व टप्पाटप्पयाने अदा केले जातील. बँकेत गर्दी होणार नाही, याची प्रत्येक ऊस उत्पादकाने दक्षता घेऊन सहकार्य करावे.''- चंद्रहास गुजराथी, अध्यक्ष, चोसाका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT