crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तनचा जाब विचारणाऱ्या पित्याला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीची वारंवार छेड काढली जात असल्याचे निदर्शनास आल्याने त्यासंबंधी जाब विचारण्यास गेलेल्या तिच्या पालकांना दोन टवाळखोरांनी मारहाण केली. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यातील दोघांमध्ये मित सुनील पटेल आणि चेतन सुनील पटेल यांचा समावेश आहे.(Father beaten up for questioning minor girl bad behavior jalgaon crime news)

शहरातील रिंगरोड परिसरातील डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्या दवाखान्याजवळील बांधकामाच्या साइटवर काम सुरू आहे. इथे वॉचमन म्हणून गरीब कुटुंबीय वास्तव्यास आहे. वॉचमन असलेल्या गृहस्थाला दोन मुली व एक मुलगा आहे.

मोठ्या अल्पवयीन मुलीची परिसरातील मित आणि चेतन हे दोघे छेड काढत होते. मुलीची छेड काढण्याबद्दल तिच्या वडिलांनी दोघांना जाब विचारला असता, त्यांना दोघांसह त्यांचे वडील व एक साथीदार अशा चौघांनी शिवीगाळ करत मारहाण केली.

लाकडी दांडक्याने होत असलेली मारहाण बघून मुलीच्या आईने बचाव केला असता, तिलाही मारहाण करण्यात आली. याठिकाणचा गोंधळ पाहून गल्लीतील लोक जमा झाले.

या प्रकाराची माहिती मिळाल्यावर दीपक गुप्ता यांच्या मदतीने पिडीत मुलगी व तिचे आई-वडील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गेले. पीडिताच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT