Dr. Jaideep Visave's four-year-old daughter Jia while cremating his body.
Dr. Jaideep Visave's four-year-old daughter Jia while cremating his body. esakal
जळगाव

Jalgaon News : चिमुरडीने दिला वडिलांना अग्निडाग...! समाजमन हळहळले...

रोहिदास मोरे

Jalgaon News : वंशाचा दिवा मुलगा असतो, ही समाजाची मानसिकता आता बदलत चालली आहे. मुलगी देखील मुलाच्याच जागी असल्याची प्रचिती अनेक घटनांमधून येत आहे. (father last rituals done by 4 year old daughter jalgaon news)

या भावनेतूनच चोपडा येथील पाटील गढीवरील रहिवासी व सध्या नाशिक येथील सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. जयदीप वसावे (वय ३५) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या चार वर्षीय चिमुरडीने अग्निडाग दिला. हे दृश्‍य पाहताना सर्वांचेच डोळे पाणावले होते.

चोपडा येथील डी. फार्मसी कॉलेजचे कर्मचारी (कै.) जगन्नाथ विसावे यांचे चिरंजीव प्रा. डॉ. जयदीप पाटील हे नाशिक येथे नोकरीला असल्याने पत्नी भूमिका यांच्यासोबत वास्तव्याला होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून त्यांना चार वर्षीय जिया नावाची मुलगी आहे. आपल्या मुलीलाच ते मुलगा मानत असल्याने ते तिचा खूप लाड करायचे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यांचा संसार सुरळीत सुरु असताना नियतीने मात्र त्यांच्या सुखी संसारावर घाला घातला. बुधवारी (ता. ३) रात्री एकच्या सुमारास प्रा. डॉ. जयदीप विसावे यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले.

प्रा. डॉ. विसावे यांचे मोठे भाऊ गोकूळ विसावे हे पुणे येथे कंपनीत आहेत. चोपडा हे त्यांचे मूळ गाव असल्याने प्रा. डॉ. विसावे यांच्यावर गावीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.

त्यानुसार, सर्व सोपस्कार पार पाडून चोपडा येथील वैकुंठधाममध्ये त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. सर्वसाधारणपणे वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलगा त्यांना अग्निडाग देतो.

मात्र, प्रा. डॉ. विसावे यांना मुलगा नसल्याने त्यांच्या एकुलत्या एक कन्येच्याहस्ते अग्निडाग देण्याचे ठरले. त्यानुसार, जियाच्या हातून वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग देण्यात आला. स्मशानभूमीतील हा प्रसंग मन हेलावणारा होता. पितृछत्र हरपलेल्या चिमुरडीला पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले होते.

समाजात नवा आदर्श

वंशाचा दिवा समजल्या जाणाऱ्या मुलाकडून अंत्यसंस्काराचे सोपस्कार अपेक्षित असताना ही परंपरागत चालत आलेली प्रथा विसावे कुटुंबीयांनी मोडीत काढत मुलगी देखील मुलगाच असते. मुलगा किंवा मुलगी असा कुठलाही भेदभाव न करता, दोन्ही समान आहेत, या भावनेतून जियाच्या हातून वडिलांच् या पार्थिवाला अग्निडाग देण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे कुटुंबात नवा आदर्श निर्माण केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : युतीची सत्ता येताच उद्धवजींना मुख्यमंत्रिपदाचे वेध

आगळी दक्षिणकोंडी

‘लाट’विरहित निवडणुकीचा अन्वयार्थ...

मेंदूवर आदळणाऱ्या डिजिटल-प्रचारातून सुटलेलं काही...

एक दूसरे से करते है प्यार हम...

SCROLL FOR NEXT