farmer loan Sakal
जळगाव

Jalgaon News : कर्ज देताना शेतकऱ्यांकडून कपात केलेले शुल्क परत होणार; सुभाष पाटील यांच्या मागणीला यश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना त्यांच्याकडून सीबिल स्कोअर अथवा अन्य प्रक्रियेसाठी कापून घेतले जाणारे शुल्क रद्द करून आतापर्यंत ज्यांच्याकडून ही रक्कम कपात करण्यात आली, त्यांना ती परत करावी, अशी मागणी सभासद सुभाष पाटील यांनी बँकेच्या सर्वसाधारण सभेत केली.. ही मागणी मान्यही करण्यात आली. (Fees deducted from farmers will be refunded while providing loans jalgaon news)

जळगाव जिल्हा सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. सभेत प्रश्‍न उपस्थित करण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंतची मुदत होती, मात्र बहुतांश सभासदांना त्याच दिवशी अजेंडा प्राप्त झाला, त्यामुळे अनेक जण प्रश्‍न उपस्थित करू शकले नाहीत, अशी तक्रार अमळनेर तालुक्यातील सभासद सुभाष पाटील यांनी केली आहे.

त्यांनी स्वत: या सभेत कर्ज वाटपाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांकडून कापून घेतलेल्या दोनशे रुपये शुल्काचा मुद्दा उपस्थित केला. सन २०२२-२३मध्ये याद्वारे प्रत्येकी २३३ रुपये तसेच पुन्हा या वर्षीदेखील ही रक्कम कापून घेण्यात आली.

त्यासंबंधी पाटील यांनी विचारल्यानंतर ही रक्कम परत देण्यात येईल, असे अध्यक्षांकडून सांगण्यात आले.

तसेच निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना तसेच नव्याने होणाऱ्या सभासदांना ५० टक्केच कर्ज वाटप केले जाते, त्यामुळे एकूणच कर्जवाटप कमी होऊन बँकेच्या नफ्यावर परिणाम होतो. विविध कार्यकारी संस्थांना कर्ज वाटपातील २ टक्के व्याजाशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही. म्हणून पीक कर्जासाठी कापण्यात आलेले भाग भांडवल संस्थेस परत करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT