crime news  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : तडीपार गुन्हेगाराचा आसोद्यात गोळीबार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील आसोदा येथे शुक्रवारची पहाट गोळीबाराच्या घटनेने उजाडली. पूर्ववैमनस्य असलेल्या शत्रूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याचा राग आल्याने जिल्हा बंदी असलेल्या सराईत गुन्हेगार चेतन ऊर्फ चिंग्या सुरेश आळंदे (रा. गणेशवाडी) याने गोळीबार करीत अन्य तरुणावर प्राणघातक हल्ला केला. (Firing of criminal in Asoda jalgaon crime news)

ही घटना हॉटेल आर्यासमोर घडली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चेतन आळंदे याच्यासह त्याचा साथीदार केयूर कैलास पंदाणे (रा. शिवाजीनगर) यांना तत्काळ जेरबंद केले.

पूर्ववैमनस्यातून घटना

असोदा येथील योगेश दिगंबर कोल्हे याचा मित्र ललीत ऊर्फ सोनू गणेश चौधरी (रा. लाठी शाळेजवळ, गणेशवाडी) याच्यावर तीन ते चार महिन्यांपूर्वी लखन ऊर्फ सोनू चौधरी याने शिवाजी पुतळ्याजवळ वार करून गंभीर जखमी केले होते.

त्यावेळी जखमी ललित ऊर्फ सोनू चौधरी याला योगेश कोल्हे याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यावेळी चेतन ऊर्फ चिंग्या याच्या काही मित्रांनी त्याला उपचारासाठी दाखल करताना पाहिले होते. त्याचाच राग मनात धरून चेतन ऊर्फ चिंग्या योगेशला नेहमी फोन करून ठार मारण्याची धमकी देत होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अशी घडली घटना

शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास योगेश हॉटेल आर्याबाहेर असलेल्या सिमेंटच्या कट्ट्यावर बसला असताना, त्याला अचानक बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचा आवाज आला. त्याने रोडवर येऊन बघितले असता, त्यांना समोरून दोन इसम दुचाकीवर त्याच्याजवळ आले. त्यांनी योगेशजवळ दुचाकी थांबवून केयूर पंदाणे हा त्याच्याजवळ पळत आला. त्याने योगेशला पकडून ठेवत चिंग्या याला जिवंत सोडू नको, त्याला गोळ्या घाल, अशी चिथावणी दिली.

वार चुकवल्यानंतर पाठलाग

चेतन उर्फ चिंग्या याने त्याच्याकडील बंदुक योगेशच्या दिशेने रोखून ‘तुला आज जिवंत सोडणार नाही’, असे म्हणत त्याच्यावर गोळी झाडली. योगेशने प्रसंगावधान राखत केयूरला धक्का दिल्यामुळे चिंग्याचा नेम चुकविला आणि केयूरला जोरात धक्का देऊन योगेश कोल्हे तेथून पसार झाला. चिंग्या व केयूर यांनी काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला. मात्र, तो मिळून न आल्याने चिंग्या व त्याचा साथीदाराने तेथून पळ काढला.

गुन्हा दाखल अन्‌ तत्काळ अटक

ठार मारण्यासाठी गोळीबार झाल्यामुळे योगेश कोल्हे प्रचंड घाबरून गेला होता. त्याने घडलेली घटना कुटुंबियांना सांगितली. त्याच्यासह कुटुंबियांनी शुक्रवारी सकाळी तालुका पोलिस ठाण्यात पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून चेतन ऊर्फ चिंग्या सुरेश आळंदे व केयूर कैलास पंदाणे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाकटुकी शिवारातून दोघांच्या मुसक्या आवळल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT