esakal
esakal
जळगाव

Jalgaon News : पुनःपुन्हा आपत्तीने शेतकरी दुष्टचक्रात; 10 महिन्यांतील चित्र

देवीदास वाणी

Jalgaon News : गत वर्षीच्या जुलै-ऑगस्टपासून आता एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना एकवेळा ढगफुटी, दोन वेळा अतिवृष्टी, तर तीन वेळा अवकाळी पावसाने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. (From July August to now till April farmers have to face huge losses due to natural calamities jalgaon news)

यात सप्टेंबर २०२२ मध्ये ढगफुटीमुळे ६५ गावांतील ३२ हजार २४१ शेतकरी बाधित होऊन एकूण सर्वाधिक १३ हजार ४९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी ३६ कोटी ३८ लाख ३२ हजार एवढे नुकसान झाले. त्याची अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.

गेल्या दहा महिन्यांत वारंवार आपत्ती मागून आपत्ती आल्या. आगामी काही दिवसही अवकाळी पावसाचे आहेत. यामुळे शेतकरी निसर्गाच्या ‘दुष्टचक्रात’ अडकल्याचे चित्र आहे. अतिवृष्टी, ढगफुटी, अतिवृष्टीनंतर सलग तीन अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू या पिकांची गुणवत्ता ढासळणार असून, त्याचा परिणाम दरावर होणार आहे.

मदतीला कायम विलंब

शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईसाठी आता नव्याने निकष तयार करण्यात येत आहेत. पूर्वीच्या निकषाप्रमाणे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले तरच नुकसानभरपाईस पात्र ठरविले जाते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मात्र सातत्याने अवकाळी पावसामुळे वारंवार ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान होणे म्हणजे एकूण वार्षिक नुकसानीचा आकडा नक्की शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणारा असतो. अनेकदा पावसाळ्याच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी घोषित केलेली मदत दोन-दोन वर्षे शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो.

गत वर्षी कापसाला तेरा हजारांचा दर मिळाला हेाता. यंदाही तोच किमान दहा हजारांचा दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. यामुळे शेतकऱ्यांनी ११० टक्के कपाशीचा पेरा केला. यंदा मात्र कपाशीचे भाव आठ हजारांपर्यंत आहे. सप्टेंबर, आक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व अवकाळीने तीस टक्के कापसाचे नुकसान झाले होते. आता ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांकडे आहे. मात्र भाव नसल्याने कापूस पडून आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ४३ हजार ७४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. याचा फटका जिल्ह्यातील ९० हजार ३४१ शेतकऱ्यांना बसला. तर सततच्या पावसामुळे १३ हजार ४९५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला.

त्यामुळे तब्बल ३२ हजार २४१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या भरपाईपोटी सरकारने पॅकेज जाहीर केले. मात्र ऑनलाइनच्या घोळात अद्यापही काही शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळालेली नाही.

ऑक्टोबर २२ मधील अवकाळीचे ३० हजार ७२२ शेतकऱ्यांसाठी ३५ कोटी चार लाखांचा अहवाल पाठविण्यात आला. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. तर अवकाळी पावसाने नुकसान झालेले मार्च २०२३ मधील ११ हजार ८२१ शेतकरी, एप्रिलमधील चार हजार ४७९ शेतकऱ्यांचा नुकसानीच अहवाल आता पाठविण्यात आला आहे. ती नुकसानभरपाई केव्हा येईल या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

"शेतकऱ्यांवर वारंवार येणाऱ्या संकटांवर ठोस उपाययोजना केली पाहिजे. शेतकऱ्याचे जे नुकसान होते त्याची भरपाई तत्काळ मिळायला पाहिजे. हवामान विभाग अचूक अंदाज सांगेल, अशी यंत्रणा विकसित करायला हवी." -किशोर चौधरी, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT