fire caused by an explosion of a gas cylinder.
fire caused by an explosion of a gas cylinder. esakal
जळगाव

Jalgaon News : म्हसवे शिवारात गॅस सिलिंडरचा स्फोट

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : म्हसवे शिवारात (ता. पारोळा) येथे तीन ते चार गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.

यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तर दोन चारचाकी (ओमनी) जळून खाक झाला. (Gas cylinder explosion in Mhsve Shivara jalgaon news)

पारोळा शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या म्हसवे शिवारात शुक्रवारी (ता.१९) रात्री साडेनऊला दोन ओमनींमध्ये अवैधरीत्या गॅस भरणाऱ्या स्टेशनवर गॅस भरण्यासाठी आल्या होत्या.

गाडींमध्ये गॅस भरत असताना अचानक स्फोट झाला. यात दुकानात असलेले तीन ते चार सिलिंडर देखील फुटले तर गॅस भरण्यासाठी आलेल्या दोन्ही ओमनी जळून खाक झाल्या.

हा स्फोट एवढा भीषण होता की त्याचा आवाज दूरवर पोचला. त्यामुळे गावातील लोक भयभीत झाले.

गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच पारोळा येथील अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला त्यातील मनोज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी ओमनीला लागलेली आग आटोक्यात आणली.

आग विझल्यानंतर अग्निशमन दलाने याठिकाणी असलेल्या सुमारे २० ते २५ गॅस सिलिंडर ताब्यात घेतले. जळून खाक झालेल्या गाड्यांमध्ये अवैधरीत्या गॅस कोण भरत होते. ही वाहने कोणाची होती. हे मात्र समजले नाही.

यावेळी तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पोलिस उपनिरीक्षक अमरदीप वसावे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. म्हसवे शिवारात असलेला हा गॅसचा अवैध केंद्र तत्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT