crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : ‘एमआयडीसी’तून 10 लखांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : औद्योगीगिक वसाहत परिसरातील गुरुदेव नगरात गुदामातून गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखूचा साठा पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या पथकाने छापा टाकून जप्त केला. (Gutkha worth 10 lakh seized from MIDC jalgaon crime news)

छाप्यात नऊ लाखांची दोन वाहने व २३ हजारांची रोकड असा एकूण १९ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मद्देमाल जप्त केला. भगवान साहेबराव पाटील (३०, रा. आव्हाणी, ता. धरणगाव) याला ताब्यात घेताच त्याचा साथीदार पसार झाला. एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

गुरुदेव नगरातील गुदामात गुटखा साठवून ठेवण्यासह त्याची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या पथकाला मिळाली होती.

त्यानुसार पथकाने गुदामावर छापा टाकला. त्या वेळी विविध प्रकारचा पानमसाला, गुटखा, तंबाखू, जर्दा, सुगंधित तंबाखू असा साठा आढळला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT