Handa Morcha organized by MNS at the collector office on Monday
Handa Morcha organized by MNS at the collector office on Monday  esakal
जळगाव

Jalgaon News : मनसेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा; पाण्याची वानवा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मन्यारखेडा गावठाण या भागातील घरकुल धारक मागील १२ वर्षापासून मूलभूत सुविधांपासून (पाणी, वीज, रस्ते) वंचित आहे. त्या सुविधा पुरविण्यात याव्यात या मागणीसाठी सोमवारी (ता. ५) ‘मनसे’ तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला.

गावातील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या समस्या या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे लेखी स्वरूपात दिल्या होत्या. ( Handa Morcha organised by MNS at collector office on Monday jalgaon news )

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहरापासून अवघ्या पाच-सहा किलोमीटरवरील मन्यारखेडा (ता.जळगाव) येथील घरकुलधारक गेल्या बारा वर्षांपासून पाणी, वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. आता पाणीप्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यामागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हंडा मोर्चा काढण्यात आला. मन्यारखेडा गावात बहुतेक आदिवासी समाजबांधवांचे वास्तव्य असून, ते गेल्या बारा वर्षांपासून राहत आहेत. सद्यःस्थितीत आदिवासी बांधव विविध मूलभूत सेवा-सुविधांपासून वंचित आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गावात विकासाच्या नावाची बोंबाबोंब दिसून येते. तेथे मूलभूत सेवा-सुविधांची वानवा आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहाअभावी महिला, युवती, विद्यार्थिनीची प्रचंड कुचंबणा होत आहे. वृद्ध व स्त्रियांचे खूपच हाल होतात. पाणीप्रश्‍न चांगलाच भेडसावत आहे. पाण्यासाठी आदिवासी बांधवांना भटकंती करावी लागत आहे. वर्षानुवर्षांपासून हीच स्थिती आहे.

आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हंडा मोर्चा काढून प्रशासनाला मूलभूत सुविधांबाबत निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, जिल्हा उपाध्यक्ष जनहित राजेंद्र निकम, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, उप शहर अध्यक्ष आशिष सपकाळे, ललित शर्मा, महानगर संघटक जनहित प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळे, राहुल चव्हाण, महेश माळी, विकास पाथरे, प्रमोद रुले, अजय परदेशी, भिकन शिंपी, गणेश नेरकर, गोविंद जाधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT