Harassment of married for 10 lakhs jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 10 लाखांसाठी विवाहितेचा छळ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : खेडी बुद्रुक (ता. जळगाव) येथील माहेरवाशीन विवाहितेचा दहा लाखांसाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या सात संशयितांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Harassment of married for 10 lakhs jalgaon crime news)

खेडी बुद्रुक येथील मनिषा राठोड यांचा विवाह अकोला येथील नितीन बळीराम राठोड यांच्याशी झाला आहे. लग्नानंतर काही दिवसांतच, मनीषाच्या वडीलांनी लग्नात हुंडा कमी दिला या कारणावरुन तिचा सासरी छळ सुरु झाला.

त्यानंतर घर बांधण्यासाठी १० लाख रुपये आणावेत अशी मागणी पतीसह सासरच्यांनी केली. वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केला. छळाला कंटाळून मनिषा माहेरी जळगाव येथे निघून आल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत त्यांनी रविवारी (ता. २०) एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

त्यावरुन मनिषा यांचे पती निलेश राठोड, सासू प्रमिलाबाई राठोड (दोघे रा. अकोला), सचिन बळीराम राठोड (रा. अमरावती), बबली सुभाष चव्हाण व सुभाष चव्हाण (दोघे रा. मुंबई), वसंता जाधव, (रा. जयरामगढ, ता. खामगाव) व दामोदर काशीनाथ राठोड (रा. पातुर, जि. अकोला) या सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक अतुल पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT