Heavy rain in Yawal have damaged banana plantations Jalgaon Rain Damage news esakal
जळगाव

Jalgaon Rain Damage : यावलला वादळी पाऊस; केळीच्या बागा आडव्या

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rain Damage : शहर व परिसरात बुधवारी (ता. ७) सायंकाळी चारपासून सुमारे दोन तास वादळी पाऊस झाला. वादळाने रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत तर शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. (Heavy rain in Yawal have damaged banana plantations Jalgaon Rain Damage news)

या वादळाने काही ठिकाणी केळीच्या बागा आडव्या झाल्या असून, किती नुकसान झाले, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. तर फैजपूर, चोपडा, दहिगाव -सावखेडा रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने, एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत.

एकमेव भुसावळकडे जाणाऱ्या बसेस केवळ सुरू आहेत. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटलेल्या असून, खांब वाकलेले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अलवाडीत गारांचा पाऊस

अलवाडी (ता. चाळीसगाव) व परिसरात सोमवारी (ता. ५) वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.

वादळाचा वेग अधिक असल्याने रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्यामुळे अलवडी ते सायगाव व नांद्रे काकडणे रस्त्यावर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले. आंब्याचे झाड व इतर काही झाडे देखील जमीनदोस्त झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT