Rains arrived in the city on Wednesday.  esakal
जळगाव

Jalgaon Rain News : जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; पिकांना जीवदान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rain News : महिनाभर वाट बघायला लावलेल्या पावसाचे गुरुवारपासून जिल्ह्यात दमदार आगमन झाल्याने शेतकरी आनंदीत झाला आहे. पण खरिपाची पिके हाताबाहेर गेल्याने या पावसाचा त्यांना काहीच फायदा होणार नाही. (heavy rain weather update jalgaon news)

गेल्या २४ तासांत पारोळा, भडगाव, अमळनेरला अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्याबरोबर जळगाव शहरासह तालुका, भुसावळ, यावल , रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड अशा सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात एकूण सरासरी ३६.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

गेल्या अठरा दिवसांपासून तालुक्यात पावसाने डोळे वटारल्याने पिण्याच्या पाण्यासह पिकांची परिस्थिती दयनीय झाली होती. किंबहुना अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उभे पीक नांगर फिरवून आपली व्यथा व्यक्त केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणार्या कपाशीची वाढ खुंटून ते करपू सुकू लागल्यामुळे तालुक्याला कोरडा दुष्काळ जाहीर व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर आली. दरम्यान, ७ नोव्हेंबरला गोकुळाष्टमीच्या दिवशी वरूणराजाने पावसाची हंडी फोडत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या.

तालुक्यातील पारोळा शहर, बहादरपूर परिसरातील काही भाग तसेच इतर ठिकाणी काहीसा समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली असून लवकरच तामसवाडी तालुका पारोळा येथील बोरी धरण भरावे, अशी वरूण राजा चरणी प्रार्थना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT