The city received heavy rains along with strong winds on Thursday. Bike damaged by uprooted tree near Sagar Park. esakal
जळगाव

Jalgaon Unseasonal Rain Damage : जळगावामध्ये अर्धातास वादळी पावसाचे ‘धुमशान’

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Unseasonal Rain Damage : शहरासह परिसरात गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी अर्धातास वादळी पावसाने ‘धुमशान' केले. दोन दिवसांच्या ‘ब्रेक'नंतर अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावत नागरिकांची त्रेधा उडवली.

पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याने शहरातील काही झाडे उन्मळून पडली व रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. ( huge loss to farmers due to unseasonal rain in jalgaon news)

जिल्ह्यासह खानदेशात दोन दिवसांपूर्वी सलग दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. चाळीसगाव पट्ट्यात गारपीट झाली. या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्याचे पंचनामे पूर्ण झाले नसताना गुरुवारी सायंकाळी पुन्हा वादळी पावसाने जळगाव शहरासह परिसराला झोडपून काढले.

दिवसभर स्वच्छ आकाश असताना सायंकाळी पाचनंतर पावसाचे वातावरण तयार झाले. साधारणतः सव्वासहाला वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाने बाजारपेठेत नागरिकांची पंचाईत झाली. अनेकांना पावसापासून बचावासाठी आडोशाचा आधार घ्यावा लागला.

वाहनांचा खोळंबा

अर्धातास पाऊस झाला. मात्र वादळामुळे शहरात प्रचंड नुकसान झाले. सागर पार्कसमोर मोठे झाड उन्मळून पडले. अन्य ठिकाणी झाडे, काही रस्त्यांवर फांद्या तुटून पडल्या. शहरात रस्त्यांची कामे सुरू असल्याने काही ठिकाणी खोदकाम झाले आहे. त्यात पाणी साचले. सखल भागात पाणी साचून वाहनांचा खोळंबा झाला.

पाऊस सुरू अन् बत्ती गूल

जळगावमध्ये रविवारी व सोमवारी जोरदार पाऊस झाल्यानंतर वीजपुरवठा अर्ध्या शहरात खंडीत झाला होता. गुरुवारी सायंकाळी पाऊस सुरू होताच, वीज गायब झाली. काही ठिकाणी वादळी पावसाने वीजतारा तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. रात्रीपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT