Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee election esakal
जळगाव

Jalgaon Market Committee News : सभापती निवडीत ‘महाविकास’ मध्येच घमासान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव बाजार समिती सभापती निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारात जोरदार घमासान झाले.

महाविकास आघाडीचे उमेदवार लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांनी आपल्या शालकास महाविकास आघाडीचे श्‍यामकांत सोनवणे यांनी मारहाण केल्याचा, तसेच सभागृहातही दमदाटी करून हात उंच करून मतदान करावयास लावल्याचा आरोप केला.

दरम्यान, हा आरोप श्‍यामकांत सोनवणे यांनी फेटाळाला आहे. निवडीच्या वेळी मात्र वातावरण तंग झाले होते. (In election of Speaker there lot of confusion in Maha Vikas

Sonwane denied Patil allegations of beating schoolmaster Jalgaon News)

सभापती निवडीसाठी शनिवारी (ता. २०) बाजार समिती सभागृहात तालुका उपनिबंधक (सहकार) यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

महाविकास आघाडीकडे बहुमत असल्याने त्यांचा सभापती होणार हे निश्‍चित होते. त्यासाठी माजी मंत्री राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत बैठक होवून पहिल्य वर्षी श्री. सोनवणे यांना, तर पुढील वर्षी श्री. पाटील यांना संधी देण्याचे निश्‍चित झाले होते.

पीठासीन अध्यक्ष के. डी. पाटील यांच्या उपस्थितीत प्रक्रीया सुरू झाली तेंव्हा सभापतीपदासाठी सोनवणे यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे पाटील यांनीही अर्ज दाखल केला आणि तेथूनच वाद सुरू झाला.

देवकरांसमोर शाब्दीक वाद

अर्ज दाखल करण्यासाठी सभागृहात गेलेले पाटील पुन्हा श्री. देवकर यांच्या दालनात गेले. तेथे आपल्याला सोनवणे यांनी दमदाटी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सोनवणेंसह काही सदस्यही दालनात आल्याने गोंधळ उडाला. जोरजोरात आवाज येवू लागले. तर, पाटील हे घामाघूम होवून दालनातून ओरडतच बाहेर आले.

ही काय लोकशाही : लक्ष्मण पाटील

घामाघूम झालेले पाटील बोलण्याच्या स्थितीतही नव्हते. त्यांच्या समर्थकांनी त्यांना थेट सभागृहाबाहेर आणले. पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, कि ही काय दादागिरी सुरू आहे? सोनवणे यांनी आपल्या शालकासही दोन चापटी मारल्या. गोकुळ चव्हाण यांचा अर्जही फाडून टाकला.

तुम्हाला मतदानच घ्यायचे नसेल, तर थेट निवडच जाहीर करून टाका, असे संतप्त मतही त्यांनी व्यक्त करून ते समर्थकांसह निघून गेले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाटील पुन्हा सभागृहात

मतदानासाठी पाटील पुन्हा सभागृहात आले. हात उंच करून मतदान घेण्यात आले. यात सोनवणे यांना पंधरा, तर पाटील यांना तीन मते पडली. विशेष म्हणजे भाजप-सेना गटाची सहा मतेही सोनवणे यांना मिळाली. त्यामुळे ते विजयी झाले. तर उपसभापतीपदासाठी महाविकास आघाडीचे पांडूरंग पाटील हे बिनविरोध विजयी झाले. यानंतर लक्ष्मण पाटील यानी पत्रकारांशी बोलताना, ही प्रक्रिया चुकीची झाली असून, ती लोकशाहीला धरून नसल्याने ती रद्द करून नवीन निवडणूका घ्याव्या, अशी मागणी केली. यानंतर देवकर यांनी दोघांमध्ये समेट घडविला.

हाणामारी नव्हे शाब्दीक वाद : देवकर

गटनेते देवकर म्हणाले, की कोणतीही हाणामारी झाली नाही. दोघांनी अर्ज टाकण्याचा ठरल्यानंतर पाटील उमेदवारी माघारी घेणार होते. मात्र त्यांना वेळ न मिळाल्याने त्याचा अर्ज राहिला. पुढील वर्षी सोनवणे राजीनामा देतील. त्यानंतर पाटील यांना संधी देण्यात येईल.

कोणताही वाद नाही : सोनवणे

श्री. सोनवणे म्हणाले, की कोणताही वाद झाला नाही. आपल्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. आपल्याला देवकर यांच्यासह माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचेही सहकार्य लाभले.

निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित : के. डी. पाटील

निवडणूक निर्णय अधिकारी के. डी. पाटील यांनी सांगितले, कि सभागृहात कोणताही दबाव नव्हता. हात उंच करून मतदान घेण्यात आले. अठरापैकी पंधरा संचालकांनी सोनवणे यांना मतदान केले. तर तीन संचालकांनी मतदानच केले नाही.

असे झाले संचालकांचे मतदान

महाविकास आघाडीकडे ११ मते व भाजप- शिंदे गटाकडे सहा मते होती. एक अपक्ष मत होते. मात्र सोनवणे यांना पंधरा मते मिळाली. तर, पाटील यांच्यासह तीघांनी मतदान केले नाही.

सुनील महाजन, मनोज चौधरी, योगराज सपकाळे, जयराज चव्हाण, लीना महाजन, यमुनाबाई सपकाळे, पांडूरग पाटील, समाधान धनगर, दिलीप कोळी, अरूण पाटील, शामकांत सोनवणे (सर्व मविआ), प्रभाकर सोनवणे, मिलींद चौधरी, अशोक राठी (भाजपा), पल्लवी देशमुख (अपक्ष) यांनी सोनवणे यांना मतदान केले.

तर लक्ष्मण पाटील, संदीप लक्ष्मण पाटील (मविआ) व हेमलता नारखेडे (शिंदे गट) यांनी मतदानच केले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT