Crime Fraud esakal
जळगाव

Jalgaon Crime News : Part time job च्या नावाखाली उच्चशिक्षीत तरुणाची फसवणुक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पार्ट टाईम जॉब असल्याचे सांगत तरुणाच्या मोबाईलवर लिंक पाठविली. तरुणाने रिचार्जवर अधिक पैसे मिळत असल्याचे अमिष दाखवून तरुणाच्या खात्यातून १ लाख ३५ हजार रूपये परस्पर ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याची घटना घडली.

जिल्हापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (In name of part time job Fraud of highly educated youth In name of online recharge quarter of lakh misled Jalgaon Crime News)

शहरातील राधाकिसन वाडी परिसरात भूषण अजित चौधरी वास्तव्यास असून, ते खासगी नोकरी करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. गेल्या १४ एप्रिलला त्यांच्या मोबाईलवर पार्ट टाईम जॉब संबंधित मॅसेज आला होता.

त्यानंतर त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर एक लिंक प्राप्त झाली. त्यांनी आपला ईमेल आयडी टाकून ती लिंक ओपन केली. त्यानंतर चौधरी यांनी शंभर रुपयांचा रिचार्ज केल्यास त्यांना २४० रुपये, तर ५०० रुपयांचा रिचार्ज केल्यास ९५० रुपये मिळतील, असा मॅसेज प्राप्त झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानंतर पुन्हा एक लिंक पाठविली असताना भूषण चौधरी यांनी ती लिंक क्लिक केली. त्यानंतर त्यावर आपली माहिती भरून चौधरी यांनी शंभर रुपयांचे पेमेंट केले होते.

चौधरी यांनी समोरील व्यक्तीने पाठविलेल्या लिंकवर जावून वेळोवेळी त्यांनी सांगितल्याप्रमणे यूपीआय पेमेंट करुन सुमारे १ लाख ३५ हजार रुपये रिचार्जसाठी पाठविले होते.

परंतु, पैसे पाठवूनदेखील जॉब लागत नसल्याने तरुणाला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्याने जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Lanke Health Update : निलेश लंकेची हेल्थ अपडेट समोर, तब्बेतीत सुधारणा; दगडुशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन

Pune News: पुणे महापालिकेचा इंधनबचतीसाठी पुढाकार; वाहन वापरात ३० टक्के कपातीचा प्रशासनाकडून प्रस्ताव

Devendra Fadnavis Cabinet Instructions : सार्वजनिक वाहतूक, विमान प्रवासावर मंत्र्यांना बंधणे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाला सूचना

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावी पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; वेळापत्रक जाहीर

सोलापुरात पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज! मुंबईतून एकजण सोलापुरात आला अन्‌ ९५० ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज देऊन गेला, पोलिसांचे पथक मुंबईला रवाना, वाचा...

SCROLL FOR NEXT