Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Drainage Cleaning News : शहरात 2 दिवसांत सुरू होणार नाले सफाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य पाच नाल्यांच्या सफाईच्या निवीदा मंजूर करण्यात आल्या आहेत.

येत्या दोन दिवसांत सफाई सुरू होणार आहे. दरम्यान, शहरातील १०३ उपनाल्यांची सफाई पूर्ण झाली असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

जळगाव शहरात मुख्य पाच, तर तब्बल १०६ उपनाले आहेत. त्याद्वारे शहरातील सांडपाण्याचा, तसेच पावसाच्या पाण्याचाही निचरा होत असतो. पावसाळ्यापूर्वी या नालांची सफाई आवश्‍यक असते. (In two days in city Cleaning of drains will begin Tender for five main drains approved Cleaning of 103 sewers completed Jalgaon News)

जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकितही शहरातील नालेसफाई तातडीने सुरू करा, असे आदेश दिले आहेत. शहरात पाच मुख्य नाल्यांतून उपनाल्यांतील पाण्याचा निचरा होत असतो.

त्यामुळे या नाल्याची सफाई महत्वाची आहे. मेहरूण तलावाजवळून निघणारा मुख्य लेंडी नाला, खेडी भागातील नाला, पिंप्राळा भागातील नाला, गिरणा नदीच्या मार्गावर असलेला नाला आणि एमआयडीसी नाला या पाच नाल्यांच्या सफाईची निवीदा बांधकाम विभागातर्फे काढण्यात आली. ती मंजूरही करण्यात आली असून, त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाल्यातून गाळ दूरवर नेणार

नाल्यातून गाळ काढून तो काठावर लावला जातो. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा हा गाळ नाल्यात जावून नाले तुंबल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. यंदा मात्र नाल्यातून गाळ काढल्यानंतर तो काठावर न लावता दूरवर नेऊन टाकण्याची अट या मक्त्यात आहे. तसेच, पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई करण्याबाबतही मक्तेदारास अट आहे.

उर्वरित उपनाल्यांची सफाईही लवकरच

शहरात लहान १०६ उपनाले आहेत. त्यांची सफाई आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. याबाबत आरोग्याधिकारी उदय पाटील यांनी माहिती देतांना सांगितले, कि तब्बल १०३ उपनाल्यांची सफाई आरोग्य विभागाने पूर्ण केली. उर्वरीत तीन ते चार नाल्यांची सफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल.

"शहरातील पाच नालेसफाईची निवीदा मंजूर करण्यात आली आहे. मक्तेदारास ताबडतोब कामाची ऑर्डर देण्यात येईल. दोन दिवसांत नालेसफाईला सुरवात करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्यात येईल."

चंद्रकांत सोनगिरे, शहर अभियंता, महापालिका, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Bomb Threat : सरकारी रुग्णालयांनंतर दिल्लीतील विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

MS Dhoni CSK vs RR : चेपॉकवर धोनीची सामन्यानंतर फटकेबाजी; चाहत्यांनी स्टेडियम घेतलं डोक्यावर

Covid subvariant: चिंता वाढली! राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 'इतके' रुग्ण आढळले, पुण्यात 51 तर ठाण्यात 20

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

Team India Racism : भारतीय क्रिकेट संघात होतोय वंशभेद..? वर्ल्डकप विजेत्या संघातील माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT