जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या अकराच महिन्यात ४६५ अपघातात निरपराध वाहनधारकांचा मृत्यू झाला आहे. राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग असो की, सर्विस रोड-शहरातील रस्ते असो.
दिवसाला सरासरी दोन लोकांचा मृत्यू ठरलेलाच या नियमाने अपघाती मृत्यूंचा आकडा वाढताच आहे. अपघाताला वाहनांचा वेग जसा कारणीभूत आहे. तसेच, महापालिका, पोलिसदल आणि रस्ते सदोष, तसेच रस्ते यंत्रणाही जबाबदार आहेत.
जळगाव शहरातून एशियन महामार्ग-५६, बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग, जळगाव-औरंगाबाद राज्य मार्गांसह इतर प्रमुख रस्ते आहेत. या रस्त्यांवर अपघात नित्याचेच झाले आहे. रस्त्यांच्या दोषांवर यंत्रणेकडून पांघरूण घालण्यात येत असल्याचे चित्र आहे. ( Jalgaon accident update 465 accidental deaths in 11 months Jalgaon news)
राष्ट्रीय महामार्गच सदोष?
जळगाव जिल्ह्यातून ११० किलोमीटरचे अंतर असलेला राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून सुरु होतो. भुसावळ, जळगाव, एरंडोल, पारोळामार्गे धुळे जिल्ह्यात शिरतो. या महामार्गावर लांबपल्ल्याच्या वाहनांचा प्रचंड लोड आजवर आहे. त्यात प्रत्येकच कुटुंबात छोटीशी कार आहेच, त्या सोबतच स्पीड बाईकचे तरुणाला वेड अशा परिस्थितीत गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदा या महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात येत असून मुक्ताईनगर ते तरसोद असे काम पूर्ण झाले आहे.
मात्र, पाळधी ते तरसोदचा टप्पा बाकीच असल्याने जुन्याच एकतर्फी महामार्गावर वाहतुकीचा भार आहे. पाळधीपासून ते तरसोदपर्यंत या मार्गावर ठिकठिकाणी मानवनिर्मित अपघातस्थळे निर्माण झाली आहेत. त्यात पाळधी बायपास, बांभोरी पूल, खोटेनगरजवळील नव्या पुलाची विभागणी करणारे सर्विस रोड, अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील सर्विस रोड, आकाशवाणी चौक, इच्छादेवी, अजिंठा चौक आणि कालिकामाता मंदिर चौकातील सदोष वळणे, साइन बोर्डचा अभाव, बेशिस्त स्थानिक वाहतुकीमुळे अपघाती महामार्ग बनले आहे.
पथदीप काही लागेना...
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग, असोत की राज्य महामार्ग असो त्यावर पथदीपची सोय करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. महामार्ग प्राधिकरणाने गत तीन वर्षात जळगाव महापालिकेला पथदीपसाठी अनेकवेळा आठवण करून दिली. मात्र अद्याप कोणत्याच मार्गावर पथदीपची सोय महापालिकेकडून करण्यात आलेली नाही. परिणामी सायंकाळनंतर वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते.
पोलिसदादा...मेमोच्या मागेच
मुंबई-नागपूर महामार्गाची दुरुस्ती होऊन दीड वर्षे लोटत आले असताना तसेच, जळगाव-अजिंठा महामार्ग पूर्णत्वास आला आहे. या दोन्ही मार्गावर स्थानिक वाहतूक पोलिस, महामार्ग पोलिस परप्रांतातून आलेल्या मालवाहू वाहनांना मेमोसाठी अडवितात. त्यासाठी नागपूर रस्त्यावर गोदावरी महाविद्यालयाजवळ एक स्पीडगन वाहन तर, दुसरे फर्दापूर जवळ स्पीडगन वाहन उभे करून चारपाच वाहतूक कर्मचारी वाहतूक नियंत्रणाऐवजी वाहन धारकांना त्रास देण्यासाठीच नियुक्त करण्यात आल्याचा अनुभव येतो.
मानवनिर्मित अपघाताची कारणे
-महामार्गावर पथदीपच नाही
-साइड-पट्ट्यांची दुरवस्था
-महामार्गासह प्रमुख रस्त्यांवरील खड्डे
-सर्वाधिक व्यस्त रस्त्यांवरच बेशिस्त वाहतूक
--------------
अपघात नाव्हेंबर अखेर
वर्ष- २०२१-४२२
वर्ष-२०२२-५६५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.