Bhongra Festival
Bhongra Festival  esakal
जळगाव

Jalgaon News : सातपुड्यात सोमवार पासून भोंगऱ्या बाजाराची धामधूम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे जतन करणाऱ्या भोंगऱ्या सणास सोमवार (ता.१८) पासून प्रारंभ होत आहे. होळीचे पांग फेडण्यासाठी आणि भोंगऱ्या बाजाराचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आदिवासी बांधव सज्ज झाले आहेत.

सातपुड्याच्या पर्वतरांगेत वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांचा 'होळी' सण हा दीपोत्सवापेक्षा कमी नसतो. होळीची चाहूल लागताच आदिवादींना भोगंऱ्या बाजाराचे वेध लागतात. (Jalgaon Bhongra festival of tribal brothers of Satpura is starting from Monday)

येथील वाड्यापाड्यावर शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा चालत आली आहे. पंधरा ते वीस दिवस चालणाऱ्या भोंगऱ्या बाजारात आदिवासी बांधवांच्या जीवन संस्कृतीचे दर्शन घडते. सातपुड्यातील आदिवासी पाड्यावर पाच दिवसाचा होळी सण साजरा होतो. पाच- सहा पाडे मिळून एकच होळी पेटविली जाते. पारंपारिक पद्धतीने आदिवासी बांधव सपत्नीक होळीचे पूजन करतात.

होळी प्रज्वलित झाल्यानंतर आदिवासी महिला- पुरूष ढोल वाजवून होळीभोवती नाचगाणे करतात. काही लोक सोंगे धारण करतात. काही लोक नवस फेडण्यासाठीही सोंगे धारण करून होळीला नैवेद्य दाखवितात. सोंगाचा नवस हा पाच वर्ष करावा लागतो, त्याला मधेच खंड पाडून चालत नाही. नवस मधेच बंद पाडला तर देवाचा कोप होतो, अशी‍ ही समजूत आहे.

फाग (देणगी) ची पध्दत

पावरा बांधवांचा सर्वात आवडत्या आणि मन उल्हासीत करणाऱ्या भोंगऱ्या उत्सवासाठी बाहेरगावी राहत असलेले बांधव गावाकडे येउ लागले आहे. होळी सणासाठी फाग (देणगी) मागण्याची पध्दत आहे. आदिवासी महिला- पुरुष आदिवासी पाड्यावर घरोघरी जाऊन फाग मागतात. (latest marathi news)

देणगी गोळा करून पाच ते सहा पाडे मिळून होळीचा सण साजरा केला जातो. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या गावे,पाडे,वस्त्या येथे सोमवार (ता.१८) पासून सणास उत्साहात प्रारंभ होणार आहे. त्यासाठी एक महिना येथे उपवास करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. माघ पौर्णिमेला दांडापूजनाने होलिकोत्सवाची सुरवात होते. दांडापूजनाला विशेष महत्त्व असले तरी या सणाची आता आधुनिकतेकडे वाटचाल सुरु आहे. रविवारी (ता.२४) सांगता होणार आहे.

गावाची ओढ...

यंदाही मोठ्या प्रमाणावर पावरा बांधव सातपुड्यातील बिडगाव, कुंड्यापाणी, डूकर्णे, बलवाडी, वरला,शेवरेपाडा, बढाई, बडवाणी, वरगव्हाण, धवली, सेंधवा मध्य प्रदेश आदी ठिकाणी एकत्र येणार असुन भोंगऱ्याचा आनंदोत्सव साजरा करणार आहे. त्यामुळे वैभवशाली सातपुड्याला यात्रेचे स्वरुप प्राप्त होणार आहे.

सर्व पाड्या-वस्त्यांवरुन ढोल घेऊन आलेले आदिवासी पावरा बांधव सकाळी "घिंचरी देवी, कनसरी देवी,राणी-का-जल देवी, देवमोगरा देवी " ची व "ढोल" ची पुजा करुन फेर घेऊन नृत्य करणार आहे. भेट म्हणुन हार,कंगण,शेवया,फुटाणे यांची देवाण-घेवाणची तयारी सुरु आहे. तालुक्यात अनेक पाड्यांवर व वस्त्यांवर सणाच्या वस्तू खरेदीसाठी गजबज वाढल्याने बाजारात उत्साह आहे.

महिलांचे पेहराव.......

सणासाठी महिला खास सजतात. कमरेला चांदीचा करदोडा,बाहवा,बाजुबंद,वाकला,कडी,पिंजण्या असा असतो. पुरुषांचा पेहराव.......

धोती,टोपी,कुडता,कोट,रंगबिरंगी चष्मे.

येथे भरणार भोंगऱ्या बाजार

सोमवार(ता.१८) : अडावद,अजंड़,जुलवाणीया, निवाली, उनपदेव, पांढरी

मंगळवार (ता.१९) : मेलाने,पलसूद,नागलवाड़ी,किनगाव,वरगव्हाण,वागझिरा

बुधवार (ता.२०) : धवली,सिलावद बलसमूद,शेवरेपाडा,डुकरण्या, शिरवेल

गुरुवार (ता२१) :बलवाडी,राजपुर,पाटी, धानोरा,चांदण्यातलाव

शुक्रवार (ता.२२) : वरला,मोयदा मेनीमता,बोखराटा,शेगाव,शिरपुर, यावल,घराघती

शनिवार(ता.२३) : वैजापूर, वाघझिरा,खेतिया, औझर,गन्धावल,पळासनेर,मालवण

रविवार (ता.२४) : कर्जाना,बडवाणी,सेंधवा,पानसेमल, गोलबावडी,चैरवी,चोपडा, कुंड्यापाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT