Guardian Minister Gulabrao Patil at the groundbreaking ceremony of the proposed Bus Depot construction in Jalgaon under the Pradhan Mantri E-Bus Service Scheme esakal
जळगाव

Jalgaon : प्रधानमंत्री ई- सेवेंतर्गत शहराला मिळणार 50 बस! बसडेपो बांधकामाचे भूमिपूजन; देशातील 169 शहरांत जळगावचा समावेश

Latest Jalgaon News : देशातील १६९ महत्त्वाच्या शहरांमध्ये व राज्यामधील २३ शहरांमध्ये जळगाव शहराचा प्रधानमंत्री ई- बससेवा योजनेत समावेश करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री ई- बस सेवेंतर्गत शहरासाठी ५० बसेस प्राप्त होणार आहेत. त्यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीत मेहरुण परिसरातील प्रस्तावित बसडेपो बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या वेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. (city will get 50 buses under PM E Service)

देशातील १६९ महत्त्वाच्या शहरांमध्ये व राज्यामधील २३ शहरांमध्ये जळगाव शहराचा प्रधानमंत्री ई- बससेवा योजनेत समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने १२ मीटर लांब स्टॅण्डर्ड बसेस २४, ९ मीटर लांब मीडियम बसेस ६, ६ मीटर लांब मिनी बसेस २० अशा एकूण ५० बस मिळणार आहेत.

या कामांचा समावेश

बसडेपोच्या प्रस्तावित कामात वाहनतळ क्षेत्र, पूरक वास्तू, कुंपण भिंत, सांडपाणी व्यवस्था, विद्युत कामे, अग्निशमन संबंधित अनुषांगिक कामे असणार आहेत. यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम सुमारे दहा कोटींची आहे. (latest marathi news)

विद्युतविषयक प्रस्तावित कामे

३३ के. व्ही. विद्युत वाहिनी उभारणी (महावितरण) करण्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम ७ कोटी ७५ लाख असून, एल.टी. लाईन रोहित्र व इतर अनुषांगिक कामे (महानगरपालिका)अंदाजपत्रकीय रक्कम १.९३ कोटी रुपये आहे. रामदास कॉलनी येथील ओपन स्पेस विकसित करण्याच्या कामाचेही पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केले.

त्यात केंद्र शासन पुरस्कृत भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेतून ११,१३६ चौ.मी. एवढ्या क्षेत्रफळात विकसित करण्यात येणाऱ्या प्रस्तावित कामात प्रामुख्याने बगीचा विकसित करणे, जॉगिंग ट्रेक, सुशोभिकरण, मल्टिपर्पज कोर्ट, पिकनिक एरिया, केअर टेकर्स क्वॉर्टर, टॉयलेट युनिट, वॉटर टँक यासाठी प्रशासकीय मान्यता रक्कम ४ कोटी ५ लाख रुपये असून, यासाठी कार्यादेश देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''तुम्ही बंजारा समाजासारखे दिसत नसतानाही आरक्षण का खाल्लं?'', धनंजय मुंडेंना उद्देशून जरांगेंचं मोठं विधान

अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ; पोलिसाच्या पत्नीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, दिरानं रुग्णालयात नेलं, पण...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

SCROLL FOR NEXT